💥पानकनेर गांवात भूमिपुत्र संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य दिव्य मेळाव्यासह सत्कार सोहळा संपन्न...!


💥विविध कार्यक्रमाचे केले आयोजन मेळाव्यास हजारो शेतकरी बांधव होते उपस्थित💥 


✍️शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली ; जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वर्धापनदिना निमित्ताने 1 जानेवारी शनिवार रोजी सायंकाळी 5  वाजता विविध कार्यक्रमसह भव्य दिव्य मेळावा पार पडला आहे या कार्यक्रममात मान्यवर व हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते व तसेच दिपोत्सव करून नवीन वर्षाच्या सूभेच्छा सूद्धा देण्यात आल्या सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे भूमिपुत्र संघटनेचा भव्यदिव्य मेळावा हजारो शेतकरी बांधव यांच्या उपस्थित संपन्न झाला व तसेच येथील भूमिपुत्र वर्धापन दिनानिमित्त भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी शेतकरी जनसमुदायांना मार्गदर्शन करत पानकनेरगांव येथील मेळावा उत्साहात संपन्न होत आहे हा मेळावा पानकनेरगांव येथेच का  केला जात आहे याचे कारण सांगत पानकनेरगांव हे मोगलापासून ते निजाम व सरकारच्या स्वातंत्र्या पर्यंत  शेतकरी चळवळीला पूढे येण्याचं व  राज्याला दिशा देणार काम ते कोणत गाव करू शकेल तर ते पानकनेरगांव व तसेच पान मळ्याने प्रसिद्ध असलेल्या पानकनेरगाव येथून महाराष्ट्रभर  कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू, मध्ये पानाची निर्यात केली जायची म्हणून पान  मळ्याने प्रसिद्ध असलेल गाव ते म्हणजे पानकनेरगांव आहे व तसेच मसाल्याचे पिक म्हणून हळदिकडे पाहिले जायचे  हळद उत्पादनासाठी गाव अग्रेसर असून मराठवाडा ते विदर्भ सांगली येथे मार्केट मध्ये विक्री केली जाते.


 
हळदिचे एकमेव  उत्पादन घेणारे व तसेच प्रशिक्षण देणारे गाव म्हणजे पानकनेरगांव असा भाषणात उल्लेख करत पानकनेरगांव कौतुक सूद्धा केले व तसेच सोयाबीन,तूर पिकांचे झालेले नुकसान, पंचड वाढलेला  भ्रष्टाचार आणि शेती हि मायभूमी आहे शेतीतून पैसा आपल्या खिशात येतो जि जमीन पिकवली जाते आपल्या मूलांबाळाचा भविष्य व लग्न, व्यवहार होतो त्या मायभूमी वर जेव्हा संकट येते तेव्हा आपण पक्ष बाजूला सारून सर्व शेतकरी बांधव एकत्र येऊन संघर्ष करावा लागतो परंतु आम्ही पक्षात विभागलो गेलो कोणी राष्ट्रवादी, कोणी शिवसेना, कोणी काँग्रेस,कोणी एम आय एम, तूम्ही त्यांच्या जबाबदाऱ्या इमानदारीने पार पाडा परंतु जेव्हा शेतकरी बांधवावर अन्याय होईल तूम्ही ठामपणे उभे राहा आणि ज्या शेतीने आमच्या पिढ्यानपिढ्या जगवल्या तिला वाऱ्यावर सोडणार आहात का आमच्या मूला बाळांचे लग्न जा शेतीवर झाले आमच्या घरातले वयोवृद्ध ज्या शेतीवर राब राब राबले आणि नवीन येणाऱ्या पिढ्यांना जगण्याची दिशा दाखवली आणि म्हणून शेवटचा एक रुपये जो  खिशात येणार असेल तर तो या शेतीतून मग या शेतीला आपण वाऱ्यावर सोडणार का सांगा शेतीशिवाय पर्याय आहे का जर कोणी शेतीच्या मुळावर उठत असेल तर आपण शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन संघर्ष करायला हवा आमच्याकडे नोकरी आणि व्यवसाय नाही उद्योग नाहीत तर मग येणारा जगण्याचा उपाय असेल तर पैसा तर शेती मग आपण शेतीच्या प्रश्नाकडे किती दिवस दुर्लक्ष करायचं असे अनेक  शेतकरी हिताचे  विषय घेऊन शेतकऱ्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन केले आहे तसेच शेतकरी यांचे फिदा असलेले हवामानतज्ञ अभ्यासक पंजाबराव डख यानी सूद्धा प्रबोधन करत पिकांचे नुकसान होऊ नये वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजानुसार महाराष्ट्र भर  मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे तसेच माझे शिक्षण व हवामान निरीक्षण कसे केले या बद्दल प्रबोधन केले तसेच या मेळाव्या  निमित्ताने पानकनेरगाव येथील आदित्य नर्सरी चे संचालक संतोष शिंदे एक आदर्श शेतकरी उद्योजक म्हणून व महावीरसिंग पवार नेत्र संयोजक यांचा सूद्धा सत्कार करण्यात आला आहे.

  पाच आदर्श महिलांना साडीचोळी देऊन पाच पुरुष शेतकऱ्यांना रुमाल टोपी व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे, सोबत भूमिपुत्रांच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले आहे या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेतकरी संघटनेचे संस्थापक शेतकऱ्यांचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर हे उपस्थित होते  तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमर हबीब किसानपूत्र चळवळीचे प्रणेते तथा हवामान अभ्यासक पंजाबराव डख, भास्करा बेंगाळ सर, डॉक्टर जितेंद्र गवळी, रामेश्वर अवचार, डॉक्टर माधव हिवाळे,बिलाल खा दुरानी, उत्तमराव आरू, राजेंद्र जवंजाळ,संजय मालोकार, स्वप्निल माहोरे, संगीताताई मार्गे, डॉक्टर संतोष सुतार,डॉक्टर मिता मंडल,श्रीरंग नांगरे, संतोष सुर्वे, रामेश्वर बोरकर, सचिन काकडे, रवींद्र चोपडे,भूषण मुराळे,अंकुश पाथरकर, बाळू रोकडे,रवी जाधव, सर्व मान्यवर उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या