💥पहिल्याच दिवशी तीन लाख मुलांचे रजिस्ट्रेशन ; उद्यापासून लहान मुलांचे कोविड लसीकरण.....!

             


💥त्यासाठी काल शनिवार दि.०१ जानेवारी पासून कोविन अ‍ॅपवर मुलांचे रजिस्ट्रेशन करण्यात येत आहे💥

✍️ मोहन चौकेकर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण सुरु करण्याची घोषणा केली होती. देशातील या वयोगटातील जवळपास 10 कोटी मुलांना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी शनिवारपासून (ता. 1) कोविन अ‍ॅपवर मुलांचे रजिस्ट्रेशन करण्यात येत आहे.

दरम्यान, कोविन अ‍ॅपच्या आकडेवारीनुसार, पहिल्याच दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत देशातील सुमारे 3 लाख 15 हजार मुलांनी लसीकरणासाठी 'स्लॉट बुकिंग' केल्याचे समोर आलेय मुलांच्या लसीकरणास उद्यापासून (ता. 3) सुरुवात होणार आहे. या मुलांना फक्त भारत बायोटेकची 'कोवॅक्सिन' लस दिली जाणार आहे. कोविन अ‍ॅपवर नोंदणीसाठी दहावीचे ओळखपत्रही 'आयडेंटीटी प्रूफ' म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याचे कोविन प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितले.

कोविन अ‍ॅपशिवाय मुलांना थेट लसीकरण केंद्रावरही नोंदणी करुन लस घेता येणार आहे. एका मोबाइल नंबरवर जास्तीत जास्त चार लोकांच्या लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करता येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

*लसीकरणाबाबत महत्वाचे..*

▪️ दहावीच्या आयडी कार्डवरही रजिस्ट्रेशन करता येणार

▪️ नीडल फ्री व्हॅक्सिन Zycov-D ला मंजुरी 

✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या