💥पूर्णा नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील प्रत्येक परिसरात घरोघरी लसीकरणाची मोहीम...!


💥नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष प्रभारी मुख्याधिकारी बि.नितेशकुमार यांचा कौतुकास्पद उपक्रम💥

पूर्णा (दि.०२ जानेवारी) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील सर्व प्रभागात घरोघरी लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे ह्या मोहिमेला शहरातील नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसिलदार बि.नितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख गणेश रापतवर आणि त्यांचे सहकारी हे दररोज सकाळी ०८-०० ते सायंकाळी ०६-०० वाजेपर्यंत घरोघरी भेटी देऊन लसीकरणाचे काम उत्तम प्रकारे करत असल्याचे दिसून आले त्यांच्या पथकात नजीब एन फारुख,मोगले एस एस,उज्वलाजी आवटे,सोनाजी खिलारे,दिपक गवळी,मिलिद साबळे,आसिफ पठाण आदींचा समावेश असून त्यांचे याबद्दल शहरात सर्वत्र कौतुक केले जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या