💥पुर्णा तालुक्यातील चुडावा फाटा परिसरात स्विफ्ट कारला ॲटोने मागून धडक दिल्याने ॲटोतील ७ वर्षीय बालकाचा मृत्यू ...!


💥चुडावा पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहे💥  

पुर्णा (दि.२१ डिसेंबर) - तालुक्यातील चुडावा गावाजवळ वसमत फाटा परिसरात आज मंगळवार दि.२१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ०९-३०वाजेच्या सुमारास वसमत-नांदेड येथून पुर्णेकडे येणाऱ्या ॲटोने स्विफ्ट कारला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ॲटोतील एका २५ वर्षीय महिले सोबत असलेला तिचा ७ वर्षीय मुलगा समर्थ सुधाकर राऊत हा डोक्यात जोरदार मार लागल्यामुळे जागीच ठार झाला असल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले.

सविस्तर वृत्त असे की आज मंगळवार दि.२१ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास नांदेडकडून पुर्णेकडे येणाऱ्या स्विफ्ट कार क्र.एम.एच २६ एके ७८०५ हिस वसमतहून नांदेड व नांदेडहून पुर्णेकडे येणाऱ्या ॲटो क्र.एम एच.२६ एन ४७५७ या ॲटोने मागुन येऊन जोरदार धडक दिली यावेळी झालेल्या अपघातात ॲटोत येणाऱ्या प्रियंका व राजेश नामदेव राठोड (वय २४) रा.अंधेरी वेस्ट तलावा जवळ मुंबई यांच्या सोबत असलेला समर्थ सुधाकर राऊत वय ७ वर्षे रा.उकळी पेन जिल्हा वाशिम ह.मु मुंबई याच्या डोक्यावर तोंडावर मार लागुन जागीच ठार झाला या घटने संदर्भात चुडावा पोलिस अधिक तपास करीत आहे....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या