💥पुर्णा नगर परिषदेचा कार्यकाळ उद्या २९ डिसेंबर रोजी संपणार ; जिल्हा महसुल प्रशासन करणार प्रशासक नियुक्त....!

 💥नगराध्यक्ष गंगाबाई एकलारे यांच्यासह सर्व विद्यमान नगरसेवकांचे अधिकार येणार संपुष्टात💥


परभणी/पुर्णा (दि.२८ नोव्हेंबर) जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या नगर पालिकांवर मुदत संपल्यानंतर जिल्हा महसूल प्रशासनाने तात्काळ प्रशासक नियुक्त करावेत असे आदेश नगर विकास विभागाने काल सोमवार दि.२७ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी एका आदेशाद्वारे बजावले असून यात जिल्ह्यातील पुर्णा गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत,पाथरी या नगर परिषदांचा समावेश असून या नगर परिषदांची मुदत उद्या २९ डिसेंबर २०२१ रोजी संपणार आहे.


पुर्णा नगर परिषदेच्या सन २०१६ यावर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवून जनमतातून नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या विद्यमान नगराध्यक्षा गंगाबाई सितारामअप्पा एकलारे यांनी अत्यंत समजुतदार पणाचा प्रत्यय देत मागील पाच वर्षाच्या कालावधीत सर्वपक्षीय नगर सेवकांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली प्रत्येक अडचणींलवर मात करीत शहरात अनेक विकासकामे मार्गी लावण्यात यश मिळवले त्यांच्या या यशात त्यांचे प्रतिनिधी तथा अत्यंत शांत व संयमी व्यक्तीमत्व माजी नगरसेवक संतोष एकलारे यांचा सिंहाचा वाटा असून त्यांनी निवडणूक काळात शिवसेना पक्षाच्या वतीने प्रकाशित वजननाम्यांची १००% पुर्तता करण्याचा प्रयत्न करून शहराचा विकास घडवून आणण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत केली असेच म्हणावे लागेल.

पुर्णा नगर परिषदेची मुद्दत उद्या २९ डिसेंबर २०२१ रोजी संपणार असल्यामुळे जिल्हा महसूल प्रशासनाकडून प्रशासक नेमले जाणार असल्यामुळे विद्यमान सन्माननीय नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे,उपनगराध्यक्ष विशाल कदम यांच्यासह सर्व विद्यमान नगरसेवकांचे सर्वाधिकार संपुष्टात येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणूकांवर ओबीसी आरक्षणाचे सावट असून नुकताच काल सोमवार दि.२७ डिसेंबर २०२१ रोजी विधानसभेच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणूकांना स्थगिती देण्याचा ठराव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडून सदरील ठरावाला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठींबा दिल्याने मुद्दत संपलेल्या नगर परिषदांवर नेमलेल्या प्रशासकांचा कार्यकाळ किती दिवस राहिल हे सांता येत नाही.त्यामुळे पुर्णा नगर परिषदेचा कारभार यापुढे प्रशासकाच्याच हातात राहणार आहे....

 नगर परिषदेवर उद्या दि.२९ डिसेंबर रोजी प्रशासक येणार असल्याने आज बोगस व अर्धवट कामांची बिल निघण्याची शक्यता ;-


पुर्णा नगर परिषदेचा कार्यकाळ उद्या बूधवार दि.२९ डिसेंबर २०२१ रोजी संपणार असल्याने व प्रशासकाची नेमणूक होणार असल्यामुळे शहरातील अनेक प्रभागांमध्ये दलित वस्ती सुधार योजनेसह विविध विकास योजनांतर्गत झालेली काही अर्धवट व बोगस कामांची बिल आज मंगळवार दि.२८ डिसेंबर २०२१ रोजी घाई गडबडीने दबावतंत्राचा वापर करून किंवा आर्थिक तडजोडीतून निघण्याची शक्यता असल्यामुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पुर्णा नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसिलदार बोलेलो यांच्या नावे तात्काळ आदेश काढून अश्या अर्धवट व बोगस कामांची बिल काढण्यास प्रतिबंध करावा व बोगस कामांची तात्काळ चौकशीचे आदेश काढावे अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या