💥महात्मा समता कबीर परिषदेचा सन्मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ कवी बौद्धाचार्य उमेश बऱ्हाटे यांना प्रदान....!


💥मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाल पुष्पहार सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला💥

पूर्णा (दि.28डिसेंबर) - येथील ज्येष्ठ कवी बौद्धाचार्य उमेश बऱ्हाटे यांना महाराष्ट्र समता परिषदेचा सन्मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांच्या काव्य लेखनाबद्दल व धार्मिक योगदानाबद्दल दिल्या गेला दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड या ठिकानी माजी आमदार भाई गुरुनाथ कुरडे व नांदेड महापालिकेचे माजी उप आयुक्त प्रकाश येवले व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाल पुष्पहार सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अगोदर विद्रोही कवी संमेलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या कवींनी कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध व अंतर्मुख केले.मुंबई येथील ख्यातनाम गायिका वैशालीताई  येरेकर व परभणीच्या सुप्रसिद्ध गायिका स्वर लक्ष्मी लहाने यांच्या बहारदार गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉक्टर मुकुंदराज पाटील यांनी कार्यक्रम आयोजना पाठीमागचे भूमिका विशद केली.

उमेश बराटे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाश कांबळे नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैय्या खंदारे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड नगरसेवक मधुकर गायकवाड एडवोकेट धम्मा जोंधळे नगरसेवक मुकुंद भोळे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित पत्रकार विजय बगाटे नगरसेवक वीरेश कसबे रौफ कुरेशी सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड नागेश येगडे मुकुंद पाटील भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे उपाध्यक्ष गौतम वाघमारे ज्ञानोबा जोंधळेसरचिटणीस अतुल गवळी कोषाध्यक्ष किशोर ढाक र गे शहराध्यक्ष बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे माजी तालुकाध्यक्ष एम  यू खंदारे श्यामराव जोगदंड बाबाराव वाघमारे टी झेड कांबळे वारा काळे शिवाजी थोरात भगवान गायकवाड बौद्धाचार्य अमृत कराळे रत्नदीप ये गडे सुनील खाडे विजय खंडागळे सुरज जोंधळे आदींनी व महिला मंडळांनी अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या