💥सामाजिक दायित्व जोपासणारे संवेदनशिल मनाचे हळवे व्यक्तीमत्व म्हणजेच सुभाष पवने...!


💥मंगरूळपीरच्या गटशिक्षणपदी विराजमान असलेल्या सुभाष पवणेंच्या कर्तृत्वाची सर्वच चर्चा💥 

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील साखरडोह सारख्या छोट्याशा गावात जन्मलेल्या आणी अंत्यत हलाखीच्या परिस्थितीतुन निघुन करारी बाणा असलेल्या कर्तव्यदक्षपणे शिक्षकी पेशाचे कर्तव्य पार पाडुन सध्या मंगरूळपीरच्या गटशिक्षणपदी विराजमान असलेल्या सुभाष पवणे यांच्या सामाजिक दायित्व निभावणारे संवेदनशिल हळव्या मनाचे व्यक्तीमत्व म्हणून सर्व परिचित असल्याचे आणखी एक ऊदाहरण समोर आले आहे.

       ज्या परिस्थीतीतुन आपण समोर आलो आणी घडलो ही झळ इतरांना लागु नये त्यामुळे सतत आपल्या सामाजिक दायित्वाची जबाबदारी सांभाळत तळागाळातल्या लोकांसाठी नेहमी सढळ हाताने मदत करणार्‍या मंगरूळपीर येथील पंचायत समितीचे गटशिक्षणअधिकारी श्री.सुभाष पवणे हे जिथे जातात तिथे आपले कर्तव्य जरूर बजावतात हे माञ विषेश.कर्तव्यावर जात असतांना मंगरुळपीर येथील छञपती शिवाजी महाराज चौकात छोटा कलाकार व त्याची लहाण बहिण सरांच्या दृष्टीपथास पडली.हा छोटा मुलगा ऊंचच ऊंच काठ्यावर मोठ्या शिताफीने ऊभे राहुन तोल सांभाळून मोठ्या दिमाखात ऊभा होता तसेच तो त्या काठ्याच्या साहाय्याने चालुन लोकांचे मनोरंजन करत होता.या मनोरंजनाने खुष होऊन काही लोक दोनचार रूपये सोबत असलेल्या छोट्या बहीणीकडे देत होते.पोटाची भुक भागवण्यासाठी गरीब लोकांना काय करावे लागते?हे चिञ श्री.पवने सरांनी जवळुन बघीतले.लगेच सरांमधील अधिकारी आणी सामाजीक दायित्व जोपासणारे व्यक्तीमत्व जागृत झाले.या चिमुकल्या भावंडांना मायेने विचारपुस करुन शिक्षणाविषयी माहीती घेतली.हे चिमुकले शाळाबाह्य राहु नये हा मानस असल्याने तुम्ही शाळेत जात असता का?कुठले आहात?अशी माहीती घेतली.'आम्ही झांशी येथील रहिवाशी असुन पोट भरण्यासाठी असे मनोरंजन करतो आणी काही दिवसांसाठीच आम्ही इकडे असु' अशी माहीती त्या मुलांनी दिली.त्यामुळे शिक्षणाकरीता काही न करता येत असल्याची खंत सरांना झाली.तरीही सरांच्या  हळव्या मनात चिमुकल्यांना जागा मिळाली.त्या मुलांची कला अप्रतिम होती ती बघुन आनंदच झाला व कीवही आली.दोन्हीही मुलांना भरभरुन मदत करुन निरोप घेतला.सर्वांनी असेच आपल्या निदर्शनात पडणारे किंवा परिसरात असणार्‍या गरजुंना निश्चितच मदत करावी असे आवाहन गटशिक्षण अधिकारी सुभाष पवणे यांनी लोकांना केले आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या