💥महाराष्ट्र राज्य मंत्रालयाचे आदेश पाळण्यात अनियमितता का ?


💥नांदेड गुरुद्वारा बोर्डाने बोर्ड कायदा 1956 च्या,कलम 47 अन्वये निर्गमित मंत्रालयाच्या आदेशास दाखवली केराची टोपली💥 

नांदेड (दि.25 डिसेंबर) नांदेड शिख गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, कायदा 1956 च्या तरतुदीच्या अनुपालनाविषयी मंत्रालयाच्या आदेशाचे सन्मान राखून त्याची अमल बजावणी करणे हे एका प्रकारे कायद्याचे निर्देश असतांना देखील, गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने मात्र बोर्ड कायदा 1956 च्या, कलम 47 अन्वये निर्गमित मंत्रालयाच्या आदेशास टाळाटाळ केल्याचे चित्र समोर आले आहे. 

एकीकडे, एका कर्मचाऱ्यास गुरुद्वारा कार्यालयात सेवेत पुन्हा समाहून घेण्याविषयी मंत्रालयाच्या आदेशाची अनुपालना करण्यात येत नाही, तर दुसरीकडे त्याच कलमाचे आधार घेऊन मन्त्रालयाने दिलेल्या एका आदेशास तातडीने स्वीकृत करून ते प्रकरण थेट उच्च न्यायालयात पाचारित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर मा. जिल्हाधिकारी महोदय यांनी दिनांक 14/05/2019 रोजी गुरुद्वारा बोर्डास  मंत्रालय आदेशाची नियमानुसार अनुपालना करून तसा अहवाल सादर करावा असे निर्देश दिले असतांना देखील गुरुद्वारा बोर्ड प्रशासन आदेश पाळण्यास मागील अडीच वर्षापासून टाळाटाळ सुरुच ठेवली आहे. 

वरील विषयी सविस्तर वृत्त असे की गुरुद्वारा बोर्डाचे कर्मचारी स. सुरेंद्रसिंघ गुलाबसिंघ लोनीवाले यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी गुरुद्वारा ऍक्ट 1956 च्या कलम 47 नुसार रीतसर व कायदेशीरपणे वर्ष 2016 मध्ये महसूल मंत्रालयात धाव घेतली होती. त्यांच्या अर्जावर मा. महसूल मन्त्रालयाने दि. 8 एप्रिल 2019 रोजी आदेश देत, गुरुद्वारा बोर्डास त्यांना पुन्हा सेवेत समाहून घेण्याचे आदेश दिले. सुरेंद्रसिंघ लोनीवाले यांनी शासकीय आदेशाची प्रत जोडून गुरुद्वारा बोर्ड अध्यक्ष व अधीक्षक यांच्याकडे सेवेत रुजू करून घेण्याबाबत रीतसर अर्ज सादर करून त्यांना पुन्हा सेवेत समाहून घेण्याची विनंती प्रस्तुत केली. मात्र गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे सपशेलरित्या नकारल्याचेच चित्र पुढे आले आहे.

 नुकतेच महसूल मन्त्रालयाने दि. 8 डिसेम्बर 2021 रोजी गुरुद्वारा ऍक्ट 1956 च्या कलम 47 चाच आधार घेऊन, एका आदेशाद्वारे गुरुद्वारा बोर्डाच्या दोन बैठकां अवैध असल्याचा निर्वाळा दिला, त्यावर मात्र गुरुद्वारा बोर्डाने तातडीने आदेशांची अमलबजावणी केलेली आहे. एवढेच नव्हे तर गुरुद्वारा बोर्ड सदस्यांनी त्या आदेशाला चक्क उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. कर्मचारी विषयक आदेशाची अनुपालना करण्यात टाळाटाळ होत असली तरी मंत्रालयाच्या आदेशाची अवमानना विषयी बोर्डाची भूमिका गूढ स्वरूपाची  दिसत आहे. यामुळे सामान्य लोकांना न्याय देणाऱ्या शासनाचे आदेश व जिल्हाधिकारी साहेबांचे निर्देश आदेश पाळायचे नाहीत अशी कार्यप्रणाली गुरुद्वारा बोर्डाच्या कामकाजात प्रत्यक्ष स्वरूपात पाहण्यात येत आहे. सुरेंदरसिंघ लोनीवाले यांनी दि. 24 डिसेम्बर, 2021 रोजी लेखी स्वरुपात पुन्हा गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक स. गुरविंदरसिंघ वाधवा यांना मन्त्रालयाचे आदेश पाळण्यात येऊन त्यांना सेवेत पुन्हा रुजू करून घेण्यासाठी विनंती केली आहे. वरील विनंती अर्जाची प्रत मा. महसूल मंत्री महाराष्ट्र शासन, मा. पालकमंत्री नांदेड, प्रधान सचिव, महसूल मंत्रालय, मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड, मा.अध्यक्ष, गुरुद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड यांना पाठविण्यात आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या