💥कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ व परिसराच्या विकासासाठी पुढाकार घेतल्याबद्दल परळीत धनंजय मुंडे यांचा सत्कार...!


💥विजयस्तंभ व परिसर विकासाचा आराखडा लवकरच - धनंजय मुंडे

परळी (दि.२६) : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ व परिसराचा सर्वंकष विकास करून सुविधा निर्माण करणे व सुशोभीकरण करण्याची जबाबदारी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली असून, याबद्दल परळीतील भीम अनुयायांच्या वतीने ना. धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.

विजयस्तंभ व परिसराचा 100 कोटी रुपयांचा विकास आराखडा येत्या काही दिवसातच अर्थ खात्याकडे  मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असून परिसर विकासासाठी लागणाऱ्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पुणे यांना देण्यात आल्याची माहिती यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली.

या सत्कार कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. विनोद जगतकर, रा. कॉ.चे शहर सरचिटणीस अनंत इंगळे, रवि मुळे, शंकर साळवे, प्रा. श्याम दासुद, राज जगतकर, आशोक जगतकर,मुक्ताराम गवळी, प्रताप समिंदरसवळे, रमेश मस्के, नवनाथ जोगदंड, रावसाहेब जगतकर,निलेश वाघमारे, दयाल शिंदे, वैजनाथ सावंत,राहुल जगतकर, संजय जोगदंड, दौलत हानवते, सुनिल अवचारे, अरविंद बन्सोडे यांसह भीम अनुयायी बांधव उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या