💥पूर्णेतील जिल्हा परिषद शाळातील सेवानिवृत्त शिक्षक धोंडोपंत घन गुरूजी यांचे निधन....!


💥त्यांच्या पश्चात दोन मुल दोन मुली नातवंड असा मोठा परिवार आहे💥

पूर्णा ; येथील जिल्हा परिषद शाळेत तब्बल ३७ वर्षे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देऊन अनेक विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवून सेवानिवृत्त झालेले व आपल्या कर्तृत्वाने तमाम पुर्णेकरांमध्ये आदराचे स्थान निर्माण केलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक धोंडोपंत बाबाराव घन गुरूजी यांचे काल शुक्रवार दि.२४ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ०८-०० वाजेच्या सुमारास नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना आलेल्या हृदयविकाराच्या  तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पार्थिव देहावर येथील पुर्णा नदीकाठावरील हिंदु स्मशानभुमीत आज शनिवार दि.२५ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२-४० वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात दोन मुल दोन मुली नातवंड असा मोठा परिवार असून शहरातील प्रतिष्ठित व्यापारी अरविंद धोंडोपंत घन व संतोष धोंडोपंत घन यांचे ते वडील होत...

घन परिवाराच्या या दुःखात जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स परिवार सहभागी असून इश्वर स्व.धोंडोपंत घन गुरूजी यांच्या आत्म्यास शांतो देवो ही इश्वरा चरणी प्रार्थना....भावपूर्ण श्रद्धांजली💐.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या