💥पुर्णेत स्वातंत्र्य सैनिक कै.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.हरिभाऊ पाटील कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन...!


💥डॉ.हरिभाऊ पाटील कार्यगौरव सोहळ्यास प्रमुख वक्ते म्हणून निवृत्त शिक्षण संचालक श्री.डॉ.गोविंद नांदेडे यांची उपस्थिती💥

पुर्णा ; येथील विद्या प्रसारणी सभेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य शासनाचा 'आदर्श शिक्षक' पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ.हरिभाऊ देवराव पाटील हे शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर येत्या शुक्रवार दि.३१ डिसेंबर  २०२१ रोजी सेवा निवृत्त होत असून त्यांच्या एकंदरीत कार्याचा गौरव म्हणून येथील स्वा.सै.कै.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार दि.०१ जानेवारी २०२२ रोजी सायं.०६-०० वाजेच्या सुमारास त्यांच्या 'कार्य गौरव सोहळ्याचे' आयोजन येथील आदर्श कॉलनी मैदान येथे करण्यात आले आहे.


तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणून जनसामान्यांत परिचित असलेले डॉ.हरिभाऊ पाटील सर यांच्या कार्य गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा जेष्ठ नेते उत्तमराव दादा कदम हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे खासदार संजय जाधव व जेष्ठ समाजसेवक तथा जेष्ठ आरोग्य तज्ञ डॉ.दत्तात्रय वाघमारे तर डॉ.हरिभाऊ पाटील कार्य गौरव सोहळ्यास प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्याचे निवृत्त शिक्षण संचालक श्री.गोविंद नांदेडे साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे तर या भव्य कार्य गौरव सोहळ्यास श्री.वेदमुर्ती उमेश महाराज टाकळीकर,श्री.रामनारायनजी मुंदडा गुरूजी,जेष्ठ आरोग्य तज्ञ श्री.डॉ.द्वारकादासजी झंवर साहेब,पोलिस निरिक्षक अशोक घोरबांड नांदेड,पुर्णा नगर परिषदेचे मा.उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगर सेवक उत्तमभैया खंदारे,शेख महेबुब शेख रहेमान गुरूजी,जेष्ठ पत्रकार तथा दैनिक दिलासा वर्तमान पत्राचे संपादक श्री.संतोषराव धारासुरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून सदरील डॉ.हरिभाऊ पाटील कार्य गौरव सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन स्वातंत्र्य सैनिक कै.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल विजयकुमार कदम,सचिव जगदीश जोगदंड,कार्यवाहक संतोष एकलारे यांनी केले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या