💥परभणी जिल्ह्यात गोवंशाची खुलेआम तर गाईंची चोरी छुपे होणारी कत्तल तात्काळ थांबवा...!


💥गोवंश सुरक्षा व रक्षा संघटनेतर्फे गोवंश कत्तली थांबविण्याची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी💥

परभणी (दि.२१ डिसेंबर) : जिल्ह्यात सर्वत्र गोवंशाची खुलेआम तर गाईंसह दुधाच्या जनावरांची मोठ्या प्रमाणावर अनाधिकृतरीत्या कत्तल केली जात असून उघडपणे जिल्ह्यात सर्वत्र खुलेआम मांस विक्री केली जात असतांना प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रशासनाने तातडीने या अनाधिकृत गो-गोवंशाच्या होणाऱ्या हत्येविरोधात कठोर भूमिका घेऊन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गोवंश सुरक्षा व रक्षा संघटनेच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

       जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना व महापालिका आयुक्त देविदास पवार या तीघांना एका शिष्टमंडळाने आज मंगळवार दि.२१ डिसेंबर २०२१ रोजी एक निवेदन सादर केले. त्याद्वारे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील आठवडी बाजारात, परभणीच्या गुरुवार बाजारात गोवंश व इतर जनावरांचे दाखले न तपासता सरळ खरेदी-विक्री सुरु आहे. इतर राज्यातूनही या जनावरांची आयात-निर्यात होते आहे. महापालिकेंतर्गत यंत्रणा या गोष्टीकडे सोयीस्कररीत्या कानाडोळा करीत आहे. अन्य यंत्रणासुध्दा कमालीच्या उदासीन आहेत. त्याचा परिणाम सद्यस्थितीत परराज्यातून चोरीच्या मार्गाने येणार्‍या गायी व इतर जनावरांची गल्ली बोळांमधून सर्रासपणे कत्तल सुरु आहे. कत्तल झालेल्या जनावरांचा रक्ताने माखलेला मांस व हाडाचा मलबा गल्लीतील छोट्या-मोठ्या नाल्यांमधून सोडल्या जात आहे. हे प्रकार अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तात्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे, जनावरांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून सक्तीने तपासणी करावी. अनाधिकृत कत्तल व वाहतूकीच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन महाराज, सचिव रमाकांत दुधगांवकर, उपाध्यक्ष अनिल सरदेशपांडे आदींनी केली आहे.

*******************************************

💥पुर्णेतील रिलायबल ॲग्रो फुड्स च्या नावावर चालणाऱ्या  कात्तलखान्यात दुधाच्या जनावरांसह गाभल जनावरांची होतेय कत्तल..


पुर्णा ; शहराच्या अगदी लगत असलेल्या कानखेड शिवारात रिलायबल ॲग्रो फुड्स कंपनीच्या नावावर चालणाऱ्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणात दुधावरील म्हशींसह गाभन म्हशींची बेकायदेशीरपणे कत्तल केली जात असून या कत्तलखान्यात होणाऱ्या बेकायदेशीर जनावरांच्या कत्तलीस प्रशासन सुध्दा जवाबदार असून अनेकवेळा तक्रारी केल्यानंतर सुध्दा जिल्हा प्रशासन तक्रारींची कुठलीच दखल घेतली जात नसल्यामुळे शंकेची पाल चुकचुकतांना दिसत आहे


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या