💥दैतकर दापंत्यानी मुलाच्या वाढदिवसा निमित्ताने केला सहकुंटुंब मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प...!


💥आपले शरीर कुणाच्या तरी कामी आले पाहीजे.मृत्यूनंतरही हा देह मानवाच्या कल्यासाठी उपयोगी पडावा ही प्रेरणा💥

मरावे परी किर्ती रुपे उरावे या उक्तीप्रमाणे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील व गौर येथील रहिवासी असलेले व  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामचंद्र तांडा केंद्र गोजेगाव ता.मुखेड जि.नांदेड येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असलेले तसेच ज्यांचे शैक्षणिक व सामाजिक चळवळीत मोलाचे योगदान असणारे स.शि.दैतकर नामदेव पांडुरंग व त्याच्या सहचारिणी सौ सुमन नामदेव दैतकर व त्याच बरोबर संभाजी नामदेव दैतकर तसेच श्रेया दैतकर यांच्यासह परिवारातील सर्वांनीच  मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला.


आपले शरीर कुणाच्या तरी कामी आले पाहीजे.मृत्यूनंतरही हा देह मानवाच्या कल्यासाठी उपयोगी पडावा.  ही प्रेरणा  घेवूनच दैतकर दापंत्यानी अवयवदानाचा संकल्प केला आहे.मृत्यूनंतर आपण आपल्या मौल्यवान अशा देहाची राखरांगोळी करून टाकतो.त्यापेक्षा अवयवदानामुळे या देहदानामुळे गरजू लोकांना मदत होत असेल व मरणाच्या दारातून एखादी व्यक्ती परत येत असेल तर अवयवादानासारखे महान कार्य नाही अशा विचार यांनी व्यक्त केला.आपले आयुष्य आपला देह मरणोत्तर इतराच्या भल्यासाठी जावा अशा विचार करणारी देवमाणसं याच्या माध्यमातून पाहायला मिळाली.या त्याच्या महान  कार्याबद्द त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.द फेडरेशन आॕफ आॕरगान बाॕडी डोनेशन यांची व तसेच राष्ट्रीय देहांगदान समिती व निर्मल ग्राम व आदर्श गाव आनंदवाडी- [गौर ]ता.निलंगा यांच्या प्रेरणेतून अवयवदान व देहदान या क्षेत्रात काम करणारे नांदेड येथील राष्ट्रीय देहांगदान समितिचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री माधव अटकोर  यांच्या मदतीने त्यांनी मुलासह नामदेव दैतकर सर व  दैतकर ताईसह सर्वांनीच अवयवदानाचा फार्म भरून दिला. याप्रसंगी  वाढदिवसाठी उपस्थित सर्व नातेवाईक व मित्र मंडळी यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या