💥परभणी महानगर पालिकेच्या वतीने कोविड - 19 अंतर्गत शहरातील 50 बुथवर राबवण्यात आली लसीकरण मोहीम...!


💥शहरामध्ये मध्ये दि.22 डिसेंबर 2021 रोजी 1256 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले पुर्ण💥

परभणी (दि.२३ डिसेंबर) - शहर महानगर पालिकेच्या वतीने कोविड – 19 अंतर्गत शहरात 50 बुथवर लसीकरण मोहीम राबवीण्यात आली आहे. या वेळी आयुक्त देविदास पवार, उपायुक्त प्रदिप जगताप यांनी सर्व बुथवर पाहणी करुन नागरीकांना लसीकरण करण्याचे आवाहान केले. शहरामध्ये मध्ये दि.22 डिसेंबर 2021 रोजी 1256 लाभार्थ्यांचे लसीकरण पुर्ण झाले आहे. 

शहरामध्ये प्रत्येक प्रभागांतर्गत नगरसेवक, सहायक आयुक्त, पालक अधीकारीयांच्या सहायाने प्रत्येक बुथ वर आशा वर्कर,एएनएम, अंगणवाडी ताई, मनापाचे  कर्मचारी वआरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची मोहीम यशस्वारित्या राबविण्यात येत आहे. प्रत्येकनागरीकांच्या घरीजावुन लस घेतली किंवा नाही याची शहानीशा करुन त्यांना लस देण्यातयेत आहे. तसेच सर्वांनी सकाळी ९ ते २ व दुपारी २ ते रात्री ९ पर्यत लसीकरण चालूअसणार आहे तरी नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन महापौर मा.सौ.अनिताताई रविंद्रसोनकांबळे, आयुक्त देविदास पवार, उप महापौर भगवान वाघमारे, सभागृह नेते सयद समीऊर्फ माजुलाला, स्थायी समिती सभापती गुलमीर खान, विरोधी पक्षनेते विजय जामकर, गटनेते चांद सुभाना जाकेर खान, सौ. मंगलताई मुदगलकर, चंद्रकांत शींदे यांनी केलेआहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या