💥परभणी तालुक्यातील श्री.क्षेत्र पोखर्णीतील नृसिंह मंदिरात ५१ हजार दिव्यांचा दीपोत्सव;सात वर्षापासून उपक्रम....!


💥गेल्या सात वर्षांपासून संस्थान व ग्रामस्थ कार्तिकी महिन्याचे औचित्य साधून दीपोत्सव साजरा करीत आहेत💥

परभणी (दि.१९ नोव्हेंबर) :  परभणी तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी येथील श्री नृसिंह संस्थान व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिक महिन्याचे औचित्य साधून गुरुवार दि.१८ नोव्हेंबर २०२१ रोजी दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यात ५१ हजार दिव्यांच्या प्रकाशाने श्री नृसिंह मंदिरासह संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.


   गेल्या सात वर्षांपासून संस्थान व ग्रामस्थ कार्तिकी महिन्याचे औचित्य साधून दीपोत्सव साजरा करीत आहेत. गुरुवारी सकाळी लघुरुद्राभिषेक, ग्रामस्थ देवतांचे व कार्तिक स्वामींचे पूजन, दुपारी एक वाजता श्रींची आरती व महानैवेद्य असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मंदिर परिसरात दोन क्विंटल फुलांद्वारे सुशोभिकरण करण्यात आले. तसेच पंचक्रोषितील भाविकांनी दुपारी ३ वाजल्यापासून मंदिरात आणि मंदिर परिसरात ५१ हजार दिव्यांची आरास करण्यात सुरुवात केली. दुपारी ५ वाजता ब्रम्हवृंदांच्याहस्ते दिव्यांची वेदोक्त पध्दतीने पूजा करण्यात आली. मुख्य दीपोत्सव सोहळा सायंकाळी ०६.११ वाजता संपन्न झाला. रात्री 8 वाजता श्रींची आरती झाली. रात्री ०९-०० ते ११-०० या वेळेत बाळू गुरु महाराज गंगाखेडकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी खासदार संजय जाधव, संस्थानचे अध्यक्ष एम.आर. वाघ यांच्यासह अन्य विश्‍वस्थ, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या