💥राज्य बदनाम होतोय : आमदारावर प्रत्यक्ष जर हल्ला होत असेल तर सामान्य माणसाची काय अवस्था...!


💥परभणी जिल्ह्यामध्ये गृहखात्याचे अस्तित्व आहे काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावी अशा गंभीर घटना घडत आहेत💥

✍🏻सतीश सातोनकर.....✍🏻

 परभणी मध्ये ज्येष्ठ आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला तीव्र निषेध करणे योग्य तर आहेच परंतु राज्याच्या  कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या गृहखात्याची  जीवघेणी लापरवाही स्पष्ट उघड करणार आहे.

 महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यात त्यातल्या त्यात परभणी हिंगोली जिल्ह्यांमध्ये होत आहेत विकासाचे कोणतेही काम करताना शस्त्रधारी राजकीय गुंडांना हप्ता दिल्याशिवाय कामच करता येत नाही हे उघड गुपित सर्वांना ठाऊक आहे.

परभणी हिंगोली जिल्ह्यांमध्ये कुठलाही उद्योग-व्यवसाय नसताना विशेषता परभणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त शस्त्रास्त्र शासकीय हत्यारी परवाना खिरापती सारखा वाटण्यात आला ही गंभीर बाब गृहखात्याच्या अजूनही लक्षात आली नसावी.

सत्ताधारी पक्षाच्या सर्वात जेष्ठ आमदारावर जीवघेणा हल्ला व्हावा यावरून परभणी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे जाणवते सरकार कोणाचेही असो नागरिकांच्या जिवीताची हमी ही शासनाची पहिली जबाबदारी आहे.

 1994 ला मी व माझे सहकारी अभय निकाळजे व सुनील गावडे पाटील यांच्या सहकार्याने परभणी जिल्ह्यामध्ये व मराठवाड्यामध्ये आयुर्वेदशास्त्र पुरवठा कसा होतो व त्याचे निर्मिती मध्यप्रदेशच्या पाच ओळी च्या जंगलात कशी होते हे आम्ही महाराष्ट्राच्या समोर आणले होते.

पोलीस खात्याने त्याकाळी बऱ्याच गुंड्यांवर ती कारवाई केली होती परंतु आज परभणी जिल्ह्यामध्ये कमरेला पिस्तुल खेळण्यासारखे लावून समाजामध्ये दहशत माजविणाऱ्या गुंडांवरती सरकार कारवाई करणार आहे की नाही हा पहिला प्रश्न...

ज्या लोकांना शासकीय शस्त्र परवाने वाटले आहेत त्यांचे कॅरेक्टर कसे आहे त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी हिंसाचाराची आहे काय गुंडगिरीची आहे काय आणि जर आहे तर त्यांच्याकडे  रिवाल्वर पिस्तूल बंदुकी रायफली यांचे परवाने कसे काय ? नेमके हे कोणाच्या आशीर्वादाने घडले याची चौकशी होणे आवश्यक आहे .आणि या लोकांची शास्त्र काढून घेणे पहिले काम होणे आवश्यक आहे.

आमदारावर प्रत्यक्ष जर हल्ला होत असेल तर सामान्य माणसाची काय अवस्था आहे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला सामान्य माणसांमध्ये भीती निर्माण करणारा आहे पिस्तूल बाज गुंडापासून परभणी जिल्ह्याला मराठवाड्याला वाचवा परभणी जिल्ह्यामध्ये एटीएस ची स्थापना करावी व संघटित गुन्हेगारीच्या टोळ्या सामान्य माणसाचे जीवन शस्त्रास्त्रांच्या बळावत तेही शासन मान्य परवानगी धारक शस्त्रास्त्रांचे धमक्या दाखवून सामान्य माणसाला वेठीस धरत आहेत...

परभणी जिल्ह्यामध्ये गृहखात्याचे अस्तित्व आहे काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावी अशा गंभीर घटना घडत आहेत...गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे शस्त्रास्त्र जप्त करावे यासाठी शासनाकडे मागणी करणार असून उद्या सायंकाळी नऊ वाजता फेक फेसबुक लाईव्ह करत आहे...

 आदरणीय आमदार बाबाजानी दुर्रानी साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो....लोकशाहीमध्ये मतभेदांना चर्चा हे एक फार मोठे माध्यम असून हिंसाचाराने जर प्रश्न सोडविला जाणार असतील तर मग आपण लोकशाहीवादी आहोत असे म्हणणे लोकशाहीचा अपमान नव्हे काय....

 उद्या रात्री नऊ वाजता फेसबुक लाईव्ह कायद्याच्या राज्याला आव्हान देणाऱ्या पिस्तूल  बाज संघटित गुन्हेगारांची शस्त्रास्त्र जप्त करण्याचे धाडस परभणी जिल्हा प्रशासन करणार आहे काय ? मराठवाड्यामध्ये सभ्य नागरिक सुरक्षित नाही त्याचा हा दाखला म्हणून आमदार बाबाजानी दुर्रानी साहेबांवरचा हल्ला शासनासमोर धडधड पुरावा आहे.

गृहखातं ज्या राष्ट्रवादी पक्षाकडे आहे त्याच राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ आमदार आदरणीय बाबाजानी साहेबां सारख्या सन्माननीय आमदार साहेबांवर जर हल्ला होत असेल तर सामान्य माणसाची अवस्था काय असेल..ही बाब अत्यंत चिंतनीय असून शासनासाठी भूषणवाह नक्कीच नाही....

 आदरणीय आमदार बाबाजानी दुर्रानी साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कायदा  मानणारा एक सामान्य नागरिक म्हणून तीव्र निषेध व्यक्त करतो...परभणी जिल्ह्यासाठी एटीएस ची गरज आहे यावर राज्य शासनाने गांभीर्याने विचार करावा....

 संघटित गुन्हेगारी वर धडक मोहीम राबवण्याचे स्वातंत्र्य परभणी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात यावी यासाठी आपण आदरणीय राज्यपाल महोदय व मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मागणी करणार आहोत.

     

   सतीश सातोनकर.

 नानलपेठ परभणी मराठवाडा महाराष्ट्र.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या