💥नोयडा उत्तरप्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या धनुर्विद्या स्पर्धेत वाशिम जिल्ह्याची दैदिप्यमान कामगिरी....!


💥१० व्या अखिल भारतीय धनुर्विद्या स्पर्धा-२०२१ मध्ये वाशिम जिल्हयाने पटकावली १ सुवर्ण ३ रौप्य पदके💥

(फुलचंद भगत)


वाशिम:-दिनांक ०९/११ / २०२१ ते १३/११ / २१ या कालावधीत नोयडा उत्तरप्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या १०व्या अखिल भारतीय धनुर्विदया स्पर्धा-२०२१ मध्ये येथे आयोजित करण्यात आली होती.आयटीबीपी यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये विवीध खेळप्रकारात देशाच्या विविध राज्यातुन पॅरामिल्ट्री फोर्स,ऑल इंडीया पोलीस फोर्स अशा विविध कार्यक्षेत्रातुन जवजवळ ३१८ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता.


             महाराष्ट्र पोलीस अर्चरी संघाने सुध्दा आपला सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्र पोलीस अर्चरी संघात वाशिम जिल्हयाच्या महिला पोलीस कर्मचारी भाग्यश्री वल्लाळ ब.क्र. ११८८ आणि महिला पोलीस शिपाई रेखा लांडकर ब.नं १३८४ यांचा सहभाग होता. नेत्रदिपक कामगिरी करत कम्पाउंड ५० मिटर धर्नुविद्या या खेळप्रकारात भाग्यश्री बल्लाळ हिने प्रथम क्रमांक मिळुवन सुवर्ण पदक पटकावले तसेच ५० मिटर रॅकिंग फायनल राऊंड मध्ये द्वितीय क्रमांक व ५० मिटर महिला टिम मधुन द्वितीय क्रमांक पटकावुन १ गोल्ड तर २ रौप्य पदक पटकाविले. तर रेखा लांडकर हिने महिला टिम मध्ये द्वितिय कमांक मिळवुन रौप्य पदक पटकावुन महाराष्ट्र पोलीस अर्चरी संघाचे, अमरावती परिक्षेत्राचे तसेच वाशिम पोलीस दलाचे नाव लौकिक केले आहे.महाराष्ट्र पोलीस अर्चरी महिला संघाला रनरअप ट्रॉफी मिळवून दिली. या दोन्ही खेळाडूंनी या आधी २०१७-१८ सालच्या मनिपुर ईम्फाळ येथे आयोजित अखिल भारतीय धर्नुविद्या स्पर्धेत ०१ सुवर्ण व ०२ कास्य, २०१८-१९ सालच्या रांची झारखंड येथे झालेल्या अखिल भारतीय धर्नुविद्या स्पर्धेत ०२ सुवर्ण व ०१ कास्य, २०१९ सालच्या पश्चिम बंगाल सिलीगुडी येथे झालेल्या अखिल भारतीय धर्नुविद्या स्पर्धेत ०२ सुवर्ण व ०१ कास्य अशा पदकांची कमाई करून वाशिम जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकीक केले आहे.

USA येथे आगामी होणाऱ्या वर्ल्ड पोलीस फायर गेमसाठी तसचे सिनियर ओपन नॅशनल करीता भागश्री बल्लाळ यांची निवड झाली आहे, तर रेखा लांडकर हिची हैद्राबाद येथे होणाऱ्या ओपन नॅशनल रैंकिग राऊंड करीता निवड झाली आहे.या नेत्रदिपक कामगिरी बददल दोन्ही खेळाडुना वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री तथा गृह राज्य मंत्री ना.शंभुराज देसाई व मा.संजय पांडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मा.अनुप कुमार, अपर पोलीस महासंचालक(प्रशासन),मा. चंद्रकिशोर मिना, पोलीस उपमहानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती,मा. बच्चन सिंग

पोलीस अधीक्षक वाशिम, मा.गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक वाशिम, मा. जुनेद खान सहायक किडाअधिकारी महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा.सोमनाथ जाधव प्र.पोउपअधी.(गृह) वाशिम, मांगीलाल पवार राखीव पोलीस निरीक्षक पो.मु. वाशिम, सहा प्रशिक्षक हवालदार सुरेश शिंदे, वाशिम पोलीस किडा प्रशिक्षक आशिष जयस्वाल यांनी खेळाडूंचा सत्कार करून भविष्यात उज्ज्वल कामगिरी करीता शुभेच्छा दिल्या.मा. पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हा पोलीस दलाने भविष्यात सुध्दा अशाच प्रकारची भरीव कामगिरी करुन वाशिम जिल्हा पोलीस दलाचे नाव उंचाविण्याकरीता प्रोत्साहर दिले आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या