💥परभणी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनो सावधान ; आता कोरोना प्रतिबंधक लस नाही तर व्यापारही नाही.....!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची लस न घेणाऱ्यांच्या विरोधात सक्तीने कारवाई सुरू💥

परभणी (दि.३० नोव्हेंबर) - परभणी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनो सावधान यापुढे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याशिवाय व्यापार करता येणार नाही कारण जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी कोरोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्यांच्या विरोधात सक्तीने कारवाई करण्यास सुरूवात केली असून परभणी शहरासह जिल्ह्यातील सर्व व्यवसायिकांनी व ग्राहकांनी कोरोंना प्रतिबंधात्मक लस घेतलीच पाहिजे, जे व्यावसायिक किंवा ग्राहक हे लस घेणार नाहीत,त्या ग्राहकांना कोणत्याही वस्तू उपलब्ध होणार नाहीत तसेच व्यवसायिकांना सुद्धा लस घेतल्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही असे निर्देश जिल्हा महसूल प्रशासनाने बजावले आहेत.

 दरम्यान जिल्हाधिकारी आँचल गोयल यांनी सोमवारी सकाळपासून शहरातील विविध पेट्रोल पंपाना भेटी दिल्या, त्या पंपावरील वाहनधारकांशी हितगुज केले. लस घेतली की नाही या गोष्टीची विचारणा केली, पंप चालकांना सुद्धा लस घेतलेल्या वाहन धारकांनाचं इंधन उपलब्ध करावे असे निर्देश दिले आहेत जिल्हाधिकारी गोयल यांनी वसमत रस्त्यावरील मंत्री कॉम्प्लेक्ससमोर राष्ट्रीय महामार्गावर काही वाहनधारकांना अडवून लस घेतली कि नाही या गोष्टीची खात्री केली. यावेळी महापालिका आयुक्त देविदास पवार यांच्यासह महसूल व महापालिका प्रशासनाचा ताफा मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. जिल्हाधिकारी गोयल यांच्या सकाळपासूनच या कारवाईने लस न घेतलेल्या  ग्राहक व  व्यवसायिक आत मोठी खळबळ उडाली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या