💥पाथरी तालुक्यातील पेठ बाभळगावात ऊसाने भरलेली ट्राॅली पत्र्याच्या घरावर उलटल्याने आजी-नातवाचा दुर्दैवी मृत्यू....!


💥आज मंगळवार दि.३० नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार ते पाच वाजेची घटना💥

पाथरी :- फुलारवाडी-बाभळगाव रस्त्याने येत साखर कारखाण्या साठी ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली बाभळगाव गावाजवळ आल्यानंतर नळी दबल्याने ट्रॉली पत्र्याच्या घरावर कोसळली यात ऊसा खाली दबल्याने ४९ वर्षीय आजीचा जागीच मृत्यू झाला तर आठ वर्षीय नातीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवार ३० नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारात पाथरी तालुक्यातील पेठ बाभळगाव येथे घडली.

कारखाण्यांचा ऊस हंगाम सुरू असल्याने सर्वच ठिकाणी ऊस तोडी आणि वाहतुक सुरू आहे. मंगळवारी पहाटे ऊसाने भरलेली ट्रॉली घेऊन ट्रॅक्टर बाभळगाव येथून जात होते. पहाटे साडे चार च्या सुमारास नळी दबल्याने ट्रॅकेटरची ट्रॉली पत्र्याच्या घरावर कोसळली यात घरात झोपेत असलेल्या पार्वती रंगनाथ पवार वय ४९ आणि शिवानी संजय जाधव यांच्या अंगावर ऊस पडल्याने पार्वती पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर शिवानी संजय पवार या चिमुकलीवर उपचार सुरू असतांना दवाखाण्यात मृत्यू झाला.या अपघाताची माहिती ग्रामस्थांना समजताच त्यांनी धावाधाव करत घरावर पडलेल्या उसाच्या मोळ्या बाजुला केल्या.या वेळी गंभीर जखमी झालेल्या शिवानी या बालिकेला तात्काळ ऊपचारा साठी पाठवले मात्र दवाखाण्यात या बालिकेवर उपचार सुरू असतांना तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात पुष्पा पवार मात्र बालंबाल बचावल्याचे सांगितले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या