💥आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यावरील भ्याड हल्ल्या विरोधात व्यापारी संतप्त...!


💥सोमवार पासून पाथरी बेमुदत बंद ठेवण्याचा व्यापारी महासंघाचा निर्णय💥

✍🏻किरण घुंबरे पाटील

पाथरी :- जिल्ह्याचे नेतृत्व आ. बाबाजानी दुर्राणी यांच्यावर झालेला भ्याड हल्ला अतिशय निंदनीय आहे. त्यांच्या वरील हल्ला हा पाथरी शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे असा विचार मांडत रविवारी पाथरी शहरात व्यापारी महासंघाची बैठक होऊन हल्ले खोराला तडीपार करण्या साठी हा बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.आ दुर्रानी यांनी आजवर शहराची एकता जोपासण्याचे कार्य केलेले आहे व सलोखा टिकवून ठेवला अशा भावना उपस्थितांनी व्यक्त करत बेमुदत बंदचा निर्णय घेतला.

रविवारी पाथरी व्यापारी महासंघाची बैठक झाली, बैठकीत सर्व व्यापाऱ्यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आरोपीला तडीपार करण्याची मागणी केली, जेणेकरून व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण होईल. त्या अनुषंगाने झालेल्या घटनेच्या निषेधार्थ व्यापारी संघटनेच्या वतीने उद्या दिनांक २२ नोव्हेंबर(सोमवार) पासून बेमुदत पाथरी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पेट्रोल पंप, किराणा, भाजीपाला यासह अत्यावश्यक सेवा सुद्धा या बंद मध्ये सहभागी असणार आहेत. अशी माहिती व्यापारी महासंघाच्या वतीने देण्यात आली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या