💥श्री क्षेत्र कपिलधार येथील विकासकामांना ना.धनंजय मुंडे साहेब भरभरून निधी देतील - अजय मुंडे


💥संत श्री मन्मथ स्वामींच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले - अजय मुंडे

[राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराजांनी सुरू केलेल्या दिंडीच्या वैभवशाली परंपरेला पाहताना महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही - धनंजय मुंडे यांचा शुभेच्छा संदेश]


बीड/श्री क्षेत्र कपिलधार (दि. 19) - : शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र कपिलधार येथे तीर्थ क्षेत्र व पर्यटनाच्या दृष्टीने पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेण्यात येणार असून, येथील सर्वांगीण विकासासाठी ना. धनंजय मुंडे हे निधीची कमतरता भासू देणार नाहीत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांनी कपिलधार येथे बोलताना केले.


कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री क्षेत्र कपिलधार येथील यात्रेस यावर्षी शेकडो दिंड्या व हजारो भाविक सहभागी झाले होते. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यावेळी शिवा संघटनेच्या वतीने आयोजित महापूजा व महाआरतीच्या वेळी श्री अजय मुंडे यांची उपस्थिती होती.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराजांनी कपिलधार येथिल यात्रेच्या अनुषंगाने दिंडीची परंपरा सुरू केली. आज शेकडो दिंड्या येथे दर्शनासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने येताना पाहून डॉ. अहमदपूरकर महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या महापूजा व महारतीच्या वेळी मी उपस्थित राहणे अभिप्रेत होते मात्र आजारी असल्यामुळे मी प्रत्यक्ष येऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी यात्रेनिमित्त शुभेच्छा व्यक्त करत आलेल्या सर्व भाविकांचे आपल्या शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून स्वागत केले आहे.


शेकडो दिंड्या, लाखो भाविकांची मांदियाळी याची देही पाहून, संत मन्मथ स्वामींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले. भक्ती-व शक्तीचा हा संगम अनुभवायला मिळाला हे माझे भाग्य आहे, असेही यावेळी भक्तांशी संवाद साधताना श्री अजय मुंडे म्हणाले. 

शिवा संघटनेच्या वतीने श्री अजय मुंडे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी श्री गुरू राजशेखर शिवाचार्य महाराज अहमदपूरकर , श्री गुरू नागेश महाराज मानूरकर , श्री गुरू माढेकर महाराज,  श्री गुरू धारेश्वर शिवाचार्य महाराज, सोमनाथ आप्पा हालगे, तसेच शिवा संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, उपाध्यक्ष उमाकांत आप्पा शेटे, अभय कल्लावार,  विठ्ठल ताकबिडे, सातलीग स्वामी,   धन्याकुमार शिवनकार, वैजनाथ तोनसुरे, अनिल अष्टेकर यांसह आदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या