💥तहसीलने अनुदानाचा चेक पाठवला पण याद्या चुकीच्या पाठवल्या....!


💥दुष्काळी अनुदानापासून गंगाखेडात शेतकरी वंचित💥

गंगाखेड प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवावेत यासाठी तहसील कार्यालयाने बँकेकडे चेक पाठवला. पण याद्या चुकीच्या फॉरमॅटमध्ये पाठवल्यामुळे तो चेक बँकेत धूळखात पडून आहे आणि शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. हा प्रकार एसबीआयच्या डॉक्टर लाइन शाखेत घडला.

नरळद, ईरळद ,मरडसगाव आदी भागातील ओल्या दुष्काळाचा अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर शेतकऱ्याची झालेल्या चर्चेनंतर सखाराम बोबडे पडेगावकर यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या सोबतच एसबीआय शाखेत धाव घेत शाखाधिकारी उमरेडकर यांच्याशी ओला दुष्काळी अनुदानापासून शेतकरी का वंचित आहेत असा जाब विचारला. अधिकाऱ्यांनी या संदर्भात बँकेची काही चूक नसून तहसील कार्यालयाकडून आलेल्या याद्या चुकीच्या फॉर्मेट मध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. यावरून सखाराम बोबडे पडेगावकर यांनी तहसीलदार येरमे ,उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील ,तहसील कार्यालयातील कारकून बिल्लापट्टे व याद्या बनवणारे गजले यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात विचारणा केली. या प्रकारनातं संदर्भात लक्ष घालून सुधारित याद्या पाठवण्याचे आदेश तहसिलदारांना देण्यात येतील अशी माहिती सुधीर पाटील यांनी दिली. यावेळी सखाराम बोबडे यांचेसह माजी सरपंच जयदेव मिसे, मुंजाभाऊ लांडे आदींची सह शेतकरी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या