💥अंत्यविधीस गेलेल्या आमदार बाबाजानी दुर्रानीं यांच्यावर गुंडाचा हल्ला....!


💥पाथरी पोलीसात गुन्हा दाखल ; गुंड चाऊसला हद्दपार करण्याची व्यापारी महासंघाची मागणी💥

✍🏻किरण घुंबरे पाटील

पाथरी:-विधान परिषदेचे आ अब्दुल्लाखान दुर्रानी उर्फ  बाबाजानी हे शहरातील एका मुस्लिम समाजातील मयतीला कब्रस्थानात गेले असता त्या ठिकाणी बेंच वर बसुन सहकारी दत्तराव मायंळे यांच्याशी बोलत असतांना शहरातील मोहम्मद बीन सइद चाऊस नावाच्या गुंडाने अचानक आ.बाबाजानी यांच्यावर हल्ला करत आज रिव्हालवर नाही नाहीतर तुझा खुण करत होतो अशी धमकी देल्याची घटना गुरूवार १८ नोव्हेंबर रोजी घडली.

या विषयी आ बाबाजानी दुर्रानी यांनी पाथरी पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जुम्मा मजीत कबरस्थान पाथरी येथे गुरूवारी १८ नोव्हेंबर रोजी लालु पिता डबल सेठ कुरेशी रा.आठवडी बाजार पाथरी हे मृत्यू पावल्याने त्यांच्या अंत्यविधी साठी दुपारी दोन च्या सुमारास गेले होते.या वेळी त्यांच्या सोबत जिल्हा बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे,व बख्तियार खान,जुबेरबीन हवेल सोबत होते.हे तिघेही बेंच वर बसलेले असतांना आपसात चर्चा करत होते.त्याच वेळी अचानक पणे अजीज मोहल्यात अरब गल्लीत राहाणारा मोहम्मद बीन सइद बीन किलेब हा आ दुर्रानी यांच्या जवळ आला आणि काहिही एक न बोलता अचानक पणे त्यांना शिविगाळ करत तोंडावर,गालात चापटा मारण्यास सुरुवात केली. या वेळी आ दुर्रानी यांनी "काय  झाले मला का मारतो" अशी विचारणा केली असता या गुंडाने आज माझ्या कडे रिव्हालवर नाही नाहितर तुला गोळ्या घाघालून ठार केले असते अशी जिवे मारण्याची धमकी दिली. या वेळी आमदार बाबाजानी यांच्या  सोबत असलेल्या लोकांनी सोडवा सोडवी केली. याच वेळी हा गुंड तेथून पसार झाला. या गुंडा पासुन माझ्या जिवितास धोका असून हा व्यक्ती गुंड आहे. या चाऊस नावाच्या गुंडावर कार्यवाही व्हावी अशी तक्रार आ अब्दु्ला खान दुर्रानी उर्फ बाबाजानी यांनी पाथरी पोलीसात दिली असून पाथरी  पोलीसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

व्यापारी महासंघाचे हद्दपारी साठी निवेदन.

शहरातील व्यापारी महा संघाने पाथरी तहसिलदारांना  निवेदन देऊन गुंड प्रवृत्तीच्या महमद चाऊस याने यापर्वी जबरदस्तीने जमिन बळकावने,जिवे मारण्याचा प्रयत्न करणे व सामान्य नागरीक व्यापारी यांच्या मध्ये दहशत पसरवने या बाबत अनेक गुन्हे दाखल असल्याने   आणि गेली अनेक वर्षा पासून पाथरी शहरातील शांतता भंग करत असल्या मुळे त्याच बरोबर सदरील गुंडावर तडीपारीचा प्रस्ताव दाखल असल्याने आणि शहरातील नाकर्त्या पोलीसांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने शहरात व्यापारी आणि सामान्यात आ दुर्रानी यांच्या वरील हल्याने अशांतता पसरली असल्याने. दहशत निर्माण झाली असून या गंडावर तातडीने तडीपारी ची कार्यवाही करावी अशी मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने पाथरी तहसिलदारांना करण्यात आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या