💥परभणी शहरातील लसीकरण केंद्रावर जिल्हाधिकारी अचल गोयल यांनी दिली भेट...!


💥महानगर पालीकेच्या वतीने शहरात घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवली जात आहे💥

परभणी,दि 20 (प्रतिनिधी)ः शहरात प्रभाग क्रमांक 12 मध्ये बाबर कॉलनीत शनिवारी (दि.20)  जिल्हाधिकारी अचल गोयल यांच्या उपस्थित लसीकरण मोहीम राबण्यात आली.

महानगर पालीकेच्या वतीने शहरात घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवली जात आहे.शनिवारी बाबर कॉलनीत जिल्हाधिकारी अचल गोयल यांच्या उपस्थित लसीकरण करण्यात आले.यावेळी 

 अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे,मनपा उपायुक्त प्रदिप जगताप   यांच्या उपस्थितीत बाबर कॉलनी येथे लसीकरण मोहीम पार पाडण्यात आली. यावेळी  जिल्हाधिकारी यांनी स्वतः केंद्रावर थांबून नागरिकांचे लसीकरण करून घेतले व तसेच प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व लसीकरण पथकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी अचानक बुधवर भेटी दिल्या.या भेटीत त्यांना समाधानकारक काम अढळुन आल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.यावेळी मोहम्मद शेख यांच्यासह पालक अधिकारी,सहायक आयुक्त उपस्थित होते.दरम्याण 

दि 19 रोजी शहरात 51 बुधवर 2354 लसीकरण झाले.शहरातील ज्या नागरीकांचे पहिला आणि दुसरा डोस राहीला आहे अशा नागरीकांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन महापालीकेच्यावतीेने आयुक्त देविदास पवार यांच्यावतीने  करण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या