💥शेतकऱ्यांची तोडलेली वीज पुन्हा जोडा अन्यथा आंदोलन - फुलचंद कराड


💥महावितरणचे कार्यालय कराड यांच्या आंदोलनाने दणाणले💥 

परळी,( प्रतिनिधी) :- परळी तालुक्यात सर्व शेत शिवार पाण्याने डबडबले असून हाती आलेले पीक ओल्या दुष्काळामुळे गेलेले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला असून थोडी फार शिल्लक असलेली शेती आता वीज मंडळाच्या तुघलकी कारभार यामुळे धोक्यात आली आहे. विजेची रक्कम भरूनही वीज तोडण्याचा प्रकार परळी तालुक्यात चालू असून हे सरकार आहे की रजाकार असा प्रश्न? निर्माण झाला आहे. दोन दिवसात तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत करा अन्यथा महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा भगवान सेनेचे सरसेनापती तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांनी दिला आहे.

फुलचंद कराड यांच्या नेतृत्वाखाली मौजे लिंबुटा व परिसरातील दहा गावच्या शेतकऱ्यांनी आज दि.23 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 1 वा. महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता प्रशांत आंबाडकर यांची भेट घेतली. यावेळी फुलचंद कराड व शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाचा सामना उपकार्यकारी अभियंता यांना करावा लागला. शेतकरी रब्बी पिकासाठी तयारीला लागला आहे परंतु निसर्गाने  कृपा केलेली असताना महावितरण कंपनी वीज कनेक्शन तोडून अवकृपा करीत आहे. असा घणाघात कराड यांनी यावेळी लगावला. शेतकऱ्यांना नोटीस न देता वीज तोडणे हा गुन्हा असून शेतकऱ्यांनी पैसे भरलेले असताना त्यांचे कनेक्शन तोडणे कोणत्या कायद्याला धरून आहे. याचा खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली. परळी तालुक्यातील तोडलेले कनेक्शन दोन दिवसात जोडा अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा कराड यांनी लगावला आहे.

दरम्यान प्रशांत आंबाडकर उपकार्यकारी अभियंता यांनी वरिष्ठांशी संवाद साधून आंदोलकांची भूमिका त्यांच्या समोर ठेवली. लवकरच या बाबतीत चांगला निर्णय घेऊन असे त्यांनी सांगितले. अधिकारी इतर वेळी थकबाकीदारांना नोटीस देतात व नंतरच तोडतात परंतु शेतकरी आपले वीज कनेक्शन चे बिल भरून सुद्धा त्यांना वीज मिळत नाही ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे कराड म्हणाले. यावेळी कराड यांच्या आंदोलनामुळे महावितरण कार्यालय अक्षरशः दणाणून गेले होते. 100 पेक्षा अधिक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

 या आंदोलनात देविदास कराड, मुक्ताराम कराड, केशव कराड,  विश्वनाथ मुंडे, प्रशांत कराड, केशव कराड, व्यंकटेश कराड, विश्वनाथ स्वामी, दत्तात्रेय दिवटे, मंचक मुंडे, धोंडीबा दिवटे, वैजनाथ राठोड, साहेबराव राठोड, पांडुरंग मुंडे, लिंबाजी कराड, मोहन मुंडे, लक्ष्मण होळबे,अनिल मुंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या