💥पूर्णा – तिरुपती-पूर्णा एक्स्प्रेस ची एक फेरी रद्द....!


💥दमरे प्रशासनाने प्रवास्यांना प्रसिध्दी माध्यमातून दिला संदेश💥

विजयवाडा विभागातील नेल्लोर-पादुगुपडू सेक्शन मध्ये आणि गुंटकल विभागातील राझामपेट-नंदलूर सेक्शन मध्ये रेल्वे पटरीवर आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रेल्वे गाड्यांच्या चलनावर परिणाम झाला आहे. यामुळे काही गाड्या पूर्णतः रद्द, काही अंशतः रद्द तर काही गाड्या मार्ग बदलून धावत आहेत.

 1) आज दिनांक २२ नोव्हेंबर, २०२१ रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी सख्या ०७६०७ पूर्णां ते तिरुपती विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे. 

2) उद्या दिनांक २३ नोव्हेंबर, २०२१ रोजी तिरुपती येथून सुटणारी गाडी संख्या ०७६०८ तिरुपती ते पूर्णा हि विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे.

प्रवाशांना होणाऱ्या असुविधे बद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या