💥जलसंपदा विभागातील अनुकंपा भरतीबाबत जलसंपदा राज्यमंत्री मा.ना. बच्चुभाऊ कडू यांचा पुढाकार....!


💥अधिक्षक अभियंता दक्षता पथक औरंगाबाद यांना लेखी सूचना💥

परभणी - मराठवाडातील जलसंपदा विभागातील अनुकंपा भरतीसंदर्भात जलसंपदा विभागातील अनुकंपा भरतीबाबत जलसंपदा लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री मा.ना. बच्चुभाऊ कडू यांनी पुढाकार घेतला असून प्रहार जनशक्ती पक्ष परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बांधने यांनी पक्षाचे पदाधिकारी व अनुकंपाधारकांच्या शिष्टमंडळासह काल दि. २६/११/२०२१ रोजी अमरावती येथे जलसंपदा लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री मा. ना. बच्चुभाऊ कडू साहेब यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात लक्ष घालून अनुकंपा भरती तत्काळ सुरू करून अनुकंपा धारकांना न्याय द्यावा बाबत निवेदन दिले. 


या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व अनुकंपाधारक यांच्या सोबत मा.ना. बच्चुभाऊ कडू यांनी सविस्तर चर्चा करुन मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत येणान्या सर्व जिल्हयामध्ये अनुकंपाच्या रिक्तपदांची शासन निर्णय क्र. अकंपा -१२१९/ प्र.क्र .५६ /आठ, दिनांक ११ सप्टेंबर २०१९ नुसार तात्काळ अनुकंपा भरती करावी या बाबत अधिक्षक अभियंता दक्षता पथक, औरंगाबाद परिमंडळ कार्यालय , औरंगाबाद यांना लेखी सूचना दिली आहे . मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या मराठवाड्यातील अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असुन शासन निर्णयानुसार एकुण रिक्त पदांच्या २० टक्के जागा या अनुकंपाधारकांसाठी भरणे आवश्यक असतांनाही मागील अनेक वर्षापासून अनुकंपा भरती शासन निर्णयाप्रमाणे होत नसल्याची बाब प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मा.ना. बच्चूभाऊ कडू यांच्या लक्षात आणून दिली. या अनुकंपा भरतीमुळे अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या व वयोमर्यादा ओलांडण्याच्या उबंठयावर असणाऱ्या अनुकंपा धारकांना न्याय मिळणार आहे.

 या शिष्टमंडळात प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, वाहतुक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव, युवा उप तालुका प्रमुख शेख खदीर शेख वजीर तसेच अनुकंपा धारक गजानन घाटगे, सतिश गलांडे, अक्षय शिंदे , माधव कदम, अमित रंडाळे, सतिश भोसले, इत्यादी होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या