💥 श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे तुळशी विवाह संपन्न....!


💥सदर पूजेचे पौरोहित्य श्री योगेश गुरु इनामदार वाळूजकर शास्त्री यांनी केले‌ 💥

किरण घुंबरे पाटील

पाथरी:-जगप्रसिद्ध परमपूज्य श्रीसाईबाबा यांचे पवित्र जन्मस्थान पाथरी येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी कोव्हिड-१९ च्या नियमाचे पालन करत भाविकांची गर्दी न होऊ देता 'श्री साई स्मारक समिती पाथरीच्या' वतीने समितीचे सचिव तथा कार्यकारी विश्वस्त अॅड श्री अतुलराव चौधरी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ प्रज्ञा चौधरी यांच्या शुभहस्ते व्दादशी दिवशी १६ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह संपन्न झाला.

सदर पूजेचे पौरोहित्य श्री योगेश गुरु इनामदार वाळूजकर शास्त्री यांनी केले‌ प्रसंगी आई तुळजाभवानी महिला अर्बन सोसायटीच्या चेअरमन मा. सौ सुनंदाताई फलके, श्रीसाई स्मारक समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ना के कुलकर्णी, मंदिर अधीक्षक सौ छाया कुलकर्णी, प्रताप आमले, अजय गुरु पाथरीकर, विष्णुपंत शिंदे उपस्थितांमध्ये बालाजी बेद्रे,प्रभाकर पाटील, सुजाता डहाळे, शिवकन्या नागठाणे,कलाबाई कांबळे, कमलबाई तेलंगे, व आण्णासाहेब कांबळे व भक्तगण उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या