💥स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी चार मतदान केंद्र प्रस्तावित....!


💥10 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजतापर्यंत या निवडणूकीसाठी मतदान होणार💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम: येत्या 10 डिसेंबर 2021 रोजी अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूकीसाठी जिल्हयात चार मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. 10 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजतापर्यंत या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे.

वाशिम जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समिती सभापतीसाठी वाशिम मुख्यालयी तहसिल कार्यालयातील मिटींग हॉल येथे, कारंजा नगर परिषदेच्या सदस्यांसाठी तहसिल कार्यालय कारंजा येथे, मंगरुळपीर नगर परिषदेच्या सदस्यांसाठी तहसिल कार्यालय मंगरुळपीर येथे आणि रिसोड नगर परिषदेच्या सदस्यांसाठी तहसिल कार्यालय रिसोड येथे हे मतदान केंद्र प्रस्तावित असून प्रारुप यादी जाहिर केली आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहिर :-

अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या विधान परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. तो पुढील प्रमाणे आहे. 16 नोव्हेंबर 2021- निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करणे,  23 नोव्हेंबर 2021- नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिवस, 24 नोव्हेंबर 2021- नामनिर्देशन पत्राची छाननी, 26 नोव्हेंबर 2021- उमेदवारी अर्ज मागे घेणे, 10 डिसेंबर 2021- मतदानाचा दिवस असून यादिवशी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजतापर्यंत मतदान होईल, 14 डिसेंबर 2021- मतमोजणी, 16 डिसेंबर 2021- निवडणूक प्रक्रीया पुर्ण करणे असा आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या