💥पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या निश्क्रिय कारभारामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ...!


💥मागील अनेक वर्षापासून पाणीपुरवठा विभागात करतोय रोजंदारी कर्मचारी म्हणून काम ; वेतन देण्यासही टाळाटाळ💥

पुर्णा ; पुर्णा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात ९ एप्रिल १९९२ पासून रोजंदारी कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावणारे कर्मचारी तुकाराम गुनाजी सोळंके यांच्यावर नगर परिषद प्रशासनाकडून सातत्याने अन्याय केला जात असून त्यांच्या नंतर सन २००० साली नगर परिषदेत रोजंदारी कर्मचारी म्हणून रुजू झालेल्या आठ ते दहा रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले परंतु पुर्णा नगर परिषद प्रशासनाने तुकाराम सोळंके यांच्या नावाचा पदाचा सेवा कार्यकाळाचा राज्यातील नगर परिषदा मधील दि.११ मार्च १९९३ ते दि.२७ मार्च २००० या कालावधी मधील रोजंदारी कर्मचारी समावेशनाच्या कार्यवाही मध्ये जाणीवपूर्वक समावेश न केल्यामुळे त्यांना कायम स्वरूपी मिळणाऱ्या नौकरीच्या लाभापासून वंचित राहावे लागले.

पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या निश्क्रिय व अन्यायकारक कारभारामुळे मागील अनेक वर्षापासून पाणीपुरवठा विभागात इमानेऐतबारे कर्तव्य बजावणारे रोजंदारी कर्मचारी तुकाराम सोळंके यांना शेवटी आपल्या हक्कासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ यावी यापेक्षा लज्जास्पद बाब कोणती ? असा प्रश्न उपस्थित होत असून मागील २९ वर्षापासून पाणीपुरवठा विभागात अन्य रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यंत इमानदारीने कर्तव्य सेवा बजावणारे तुकाराम सोळंके यांना सेवेत कायम करणे तर सोडाच नगर परिषद प्रशासन त्यांचे थकीत वेतनही वेळेवर देत नसल्यामुळे त्यांनी आज बुधवार दि.१५ सप्टेंबर २०२१ रोजी नगर परिषद कार्यालया समोर आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.

पुर्णा नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता असून नगराध्यक्ष पदावर शिवसेनेच्या गंगाबाई सितारामअप्पा एकलारे विराजमान आहेत त्यांच्या कार्यकाळात तरी तुकाराम सोळंके यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु त्यांच्याही काळात आपल्यावर होणारा अन्याय दुर होत नसल्यामुळे त्यांना शेवटी आमरण उपोषणाच्या मार्गाचा अवलंब करावा लागला असून तुकाराम सोळके हे सुध्दा पुर्वाश्रमीचे शिवसैनिक असून त्यांचे लहान बंधू यापुर्वी नगर परिषदेत शिवसेनेची उमेदवारी मिळवून नगरसेवक म्हणून निवडून आले होते शिवसेनेची सत्ता असलेल्या नगर परिषदेत एका शिवसैनिकालाच जर न्याय मिळत नसेल तर मग सत्तेचा उपयोग काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून शिवसेनेच्या काळातही तुकाराम सोळंके यांच्यावर सातत्याने अन्याय केला जात असल्याने शेवटी त्यांना आमरण उपोषणाचा मार्ग निवडावा लागला असल्याचे दिसत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या