💥माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना देण्यात आली होती मनसुख हिरेनच्या हत्येची जबाबदारी...!


💥बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेने दिली होती नोटांनी भरलेली बॅग💥

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी व बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर याप्रकरणाची माहिती समोर येत आहे आरोपपत्रातून मनसुख हिरेनला संपवण्याचा कट रचल्याचा खुलासा झाला आहे. 

मनसुख हिरेनचा खून करण्याचे काम माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना देण्यात आले होते एनआयएने ३ सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या आरोपपत्र सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना खुनासाठी मोठी रक्कम दिली होती मनसुख हिरेनची हत्या करण्याचे काम घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी संतोष शेलारशी बोलून त्याला खुनात सामील होण्यास सांगितले त्यानंतर त्यांनी मिळून हिरेनचा खून केला ४ मार्च रोजी मनसुख हिरेनचा खून झाला आणि हे सर्व एकत्र भेटले होते.

आरोपपत्रात उघड झाले की २ मार्च रोजी वाझेने एक बैठक बोलवली होती ज्यामध्ये सुनील माने आणि दुसरा पोलीस कर्मचारी प्रदीप शर्मा दोघेही उपस्थित होते मनसुख हिरेन आधीच तिथे होता एनआयएच्या म्हणण्यानुसार दोघांना हिरेन कसा दिसतो हे जाणून घेण्यासाठी आणि योजनेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून वाझेने ही बैठक बोलावली होती. 

त्याच दिवशी संध्याकाळी सचिन वाझे पुन्हा एकदा अंधेरीच्या चकला येथे सुनील माने यांना भेटले आणि त्यांना बुकी नरेश गौर यांनी दिलेले सिम कार्ड आणि मोबाईल हँडसेट दिले मनसुख हिरेनच्या हत्येचे काम प्रदीप शर्मा यांना देण्यात आले होते असे आरोपपत्रात म्हटले आहे या कामासाठी प्रदीप शर्मा यांनी संतोष शेलारशी संपर्क साधला आणि पैशाच्या बदल्यात खून करू शकतो का ? असे विचारले होते तेव्हा शेलारने हो म्हटले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या