💥ग्रामपंचातीकडून घर आणी पाणीकर वेळेवर भरणार्‍या कुटुंबियातील स्ञीयांना मोफत पॅडचे वितरण....!


💥मंगरूळपीर तालुक्यातील तर्‍हाळा ग्रामपंचायतचे सरपंच-उपसरपंचांचा आगळावेगळा ऊपक्रम💥

फुलचंद भगत

मंगरूळपीर:-तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या नागपुर पुणे हायवेवरील तर्‍हाळा या गावामध्ये जे कुटुंब आपला पाणीकर व घरकर वेळेवर भरतिल त्या कुटुंबियामधील महिलांना सरपंचा प्रियंका महल्ले व ऊपसरपंचा शिला भगत यांच्या मानधनामधुन मोफत पॅडचे वितरण सुरु केले आहे.

               तऱ्हाळा गावामध्ये सरपंचां प्रियंका विवेक महल्ले व उपसरपंचा शिलाताई दिलीप भगत यांच्या मानधनातून व csc सोसायटी यांच्या सहकार्याने गावातील वार्ड दत्तक घेऊन पाच वर्ष मोफत पॅड चे  वाटप करण्याचा माणस त्यांनी ठेवला आहे. मासिक पाळीची व्यवस्थित काळजी न घेतल्यास महिलांना /मुलींना विविध आजारांना सामोरे जावे लागते व जास्तीत जास्त आजार त्या मुळे होतात  ही महिलांची समस्या त्यांनी घेरून जो गावातील नागरिक आपला घर टॅक्स व पाणी टॅक्स वेळेवर भरतील त्यांच्या परिवारातील महिलांना व मुलींना मोफत पाच वर्ष सॅनिटरी पॅड चे वाटप ग्रामपंचायत व सिएससी सोसायटी यांच्या माध्यमातून करण्यात आले.या ऊपक्रमाच्या माध्यमातुन ग्रामपंचायतची करवसुली तसेच महिलांच्या मासिक पाळीमधील समस्येविषयीही जनजागृती करुन मदत मिळणार आहे.यावेळी सिएससी सोसायटी वाशिम जिल्हा चे अध्यक्ष सागर म्हैसने सरपंचा प्रियंका विवेक महल्ले,ऊपसरपंचा शिला दिलीप भगत ग्रामपंचायत सदस्य नायजुल्ला खान,गणेश म्हैसने अजय मोहाळे, रयजुल्ला खान आदींनीही या ऊपक्रमामध्ये पुढाकार घेतला.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या