💥काल रात्री जसा जसा पावसाचा जोर वाढत होता,तसंच इकडं माझ्या शेतकरी राजाचा जीव तिळ तिळ तुटत होता...!


💥कविता "व्यथा शेतकरी राज्याची " कवि - नितीन कदम


काल रात्री जसा जसा
पावसाचा जोर वाढत होता,
तसंच इकडं माझ्या
शेतकरी राजाचा जीव
तिळ तिळ तुटत होता,

डोळ्याला डोळा लागलाच नव्हता
रात भर
उजवी कुशी डावी कुशी करता करता
आखी राञ झुरत होती,
कारण इकडं विचाराचे
थैमान डोक्यात नाचत होते,

दिवस राञ केलेली मेहनत
राञदिन केलेले कष्ट
पाण्यासारख्या गाळलेला मातीत घाम
त्या घामाला,
आता काहीच मोल राहिले नव्हते..
कारण घामाने पिकवलेल्या शेतात सोयाबीनच्या उभ्या पिकाला
कोंब जे फुटत होते,

ऐवढ होऊन सुद्धा शेतकरी माझा हरला नाही की तो थकला नाही,
समोर जाऊन उभा राहिला
येणाऱ्या प्रत्येक संकटाला,
कारण त्याला पण माहित होत..
असे संकटे खूप येतील
खूप जातील कारण आता जगवायचे आहे.साऱ्या जगाला ,

कारण लढायचं आहे फक्त शेतकऱ्यांलाच ...
कारण लढायचे आहे फक्त शेतकऱ्यांलाच...

      
 कवी - नितीन कदम परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या