💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स...!


💥देशात सलग पाचव्या दिवशी दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट💥

 ✍️ मोहन चौकेकर

▪️दिल्लीत 6 दहशतवाद्यांना अटक, 2 जणांना मिळाली पाकमध्ये ट्रेनिंग! दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कामगिरी. स्पेशल सेलच्या टीमने यूपी एटीएस पथकासह प्रयागराज इथं छापा घालून सहा जणांना पकडले.

▪️परप्रांतियांची नोंद ठेवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, अत्याचारातील नराधमांना वचक बसवा… उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पोलिसांना सूचना.

▪️साकीनाका घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये 'निर्भया पथक' स्थापन करण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश.. पोलिसांना आयुक्तांकडून दक्ष राहण्याच्या सूचना.

▪️देशात सलग पाचव्या दिवशी दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट, मृतांच्या आकड्यात मात्र वाढ. राज्यात सोमवारी 2740 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3233 रुग्ण कोरोनामुक्त.

▪️जेएसडब्ल्यू कंपनीचा राज्य शासनासोबत 35 हजार 500 कोटींचा सामंजस्य करार.. कंपनी जलविद्युत व पवनऊर्जा क्षेत्रात काम करणार.. रोजगार निर्मिती होणार.

▪️श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आधीच अलविदा करणारा मलिंगा आता लीग क्रिकेटही खेळणार नाही.

▪️आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर उचलबांगडी. महिला आयोग व नाशिकच्या महसूल आयुक्तांकडे देवरेंनी केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचा अहवाल सादर.

▪️आता शहरी भागातही स्वस्त भाव धान्य दुकाने सुरू होणार; छगन भुजबळांच्या प्रयत्नांना यश. 2018 मध्ये शहरी भागात नवीन दुकाने वितरणाच्या जाहिरनाम्यास दिलेली स्थगिती उठवली.

▪️दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात 36 रुपयांची घसरण. राजधानीत सोन्याचा दर 45,888 रुपये प्रति तोळा. चांदीच्या दरात 73 रुपयांची तेजी. चांदीचा दर 61,911 रुपये प्रति किलोवर बंद 

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या