💥रिपब्लिकन सेना मेळाव्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर घरण्याशी एकनिष्ठ पणे राहणार अशी भिमसैनिकांनी घेतली प्रतिज्ञा...!


💥रिपब्लिकन सेना आयोजित स्वाभिमानी मेळावा व पक्षप्रवेशा प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांनी दिली प्रतिज्ञा💥

परभणी ; येथील बि.रघुनाथ सभागृहात नुकताच रिपब्लिकन सेनेचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्या बोलतांना रिपब्लिकन सेनेचे परभणी जिल्हा अध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी असे नमूद केले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा राजकारणामध्ये वापर करून काही लोक आपल्या समाजाची दलाली करत आहेत पण आता हे यापुढे चालणार नाही कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आपले दैवत मानणारा कार्यकर्ता आता जागृत झाला आहे.


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला स्वाभिमानाने जगण्यासाठी 'शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा' हा मुलमंत्र दिला असून त्याच मुलमंत्रांचा अंगीकार करून जर का तुम्हाला आम्हाला तुमचे माझे आपल्या सर्वांचे घर कुटुंब ग्रामीण शहर तसेच तालुक्यासह जिल्ह्यात कुठेही सुरक्षित ठेवायच असेल तर आत्ताच या प्रसंगी ठाम असा निर्णय घ्या की मला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव पण चालतंय आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे घराने पण चालते कारण त्या  महापुरूषा मुळे आम्ही आज सन्मानानं आमच जीवन जगत आहोत आणि त्यांचे आमच्या समाजासह आमच्या कुटुंबावर एवढे मोठे उपकार आहेत की आम्ही परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यासाठी स्वतःचे प्राण देऊन सुद्धा ते उपकार फेडणे शक्यच नाही आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आंबेडकर घराण्याच्या सन्माना साठी प्रयत्नशील राहू असा या क्षणी तुमच्या हृदयावर हात ठेवून स्वतःला आंबेडकर घराण्यासाठी अर्पण करा असे ही राजकुमार सुर्यवंशी म्हणाले पुढे बोलतांना ते म्हणाले की आज आत्ता पासून असा ठाम निर्णय घ्या की यापुढे आम्ही भाई'भैय्या,दादा,भाऊ,अण्णा नेते,युवा नेते आशा कुठल्याही दलालांशी संबंध न ठेवता फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर घरण्याशी सदैव एकनिष्ठ राहणार अशी प्रतिज्ञा सर्व भीमसैनिकांना रिपब्लिकन सेनेच्या आयोजित या स्वाभिमानी मेळाव्या व पक्षप्रवेश च्या प्रसंगी सुर्यवंशी यांनी दिली....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या