💥नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण आज जिल्ह्यातील पुर परिस्थितीची पाहणी करणार...!


💥पालकमंत्री चव्हाण नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांशी प्रत्यक्ष संवादही साधणार आहेत💥

नांदेड (दि.९ सप्टेंबर) - संततधार पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण आज गुरूवार दि.९ सप्टेंबर रोजी पाहणी करणार आहेत. 

     मागील दोन दिवस नांदेड जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी तसेच जीवित हानी देखील झाली आहे. ठिकठिकाणी रस्ते खचले असून, अनेकांच्या शेतात व घरात पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण बुधवारी दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर तातडीने नांदेडकडे रवाना झाले. रात्री उशिरा ते शहरात दाखल झाले. गुरुवारी ते जिल्ह्यातील परिस्थितीबाबत प्रशासनाशी चर्चा करणार असून, नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांशी प्रत्यक्ष संवादही साधणार आहेत...

                         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या