💥पुर्णा तालुक्यातील सोन्ना गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्ठीने लावले देशोधडीला ; सहा शेतकऱ्यांच्या १० हेक्टर शेतीतील पिक उध्वस्त..!


💥निसर्गाच्या प्रकोपामुळे अन्नदाता शेतकऱ्यांवर अक्षरशः अश्रू ढाळण्याची वेळ💥


पुर्णा (दि.०८ सप्टेंबर) तालुक्यात सोमवार दि.६ सप्टेंबर ते मंगळवार दि.७ सप्टेंबर २०२१ या दोन दिवस सातत्याने झालेल्या अतिवृष्ठीमुळे तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नद्यांसह छोट्या मोठ्या ओढ्यांना आलेल्या पुरामुळे आसपासच्या शेतशिवारातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून अतिवृष्ठीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास निसर्गाच्या प्रकोपामुळे हिरावून घेतल्याचे निदर्शनास येत आहे.


 तालुक्यातील मौ.सोन्ना गावातील शेतकऱ्यांचे काल मंगळवार दि. ७ संप्टेबर २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे गोदावरी नदीला मिळणाऱ्या ओढे नाल्यांमुळे तसेच गोदावरी च्या सिध्दॆश्वर व येलदरी धरणात सोडलेल्या पाण्यामुळे तसेच माजलगाव धरणाचे  ११ दरवाजे ऊघडल्यामुळे तसेच डिग्रस बंधाऱ्यातील वाढीव पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीला महापुर आल्यामुळे सोन्ना शिवारातील नदीकाठच्या ६ शेतकऱ्यांच्या तब्बल  १० हेक्टरवरील शेतजमीनीतील सोयाबीन ,हळद ऊस ईत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन प्रशासनाने लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नासधूसीचे अर्थात नुकसानीचे पंचनामे करुन त्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी युवासेनेचे प्रा. मनोहर कदम , डाॅ. सुर्यकांत कदम, माणिक कदम यांनी केली आहे.....

********************************************

💥सोन्ना शिवारातील पिके अक्षरशः बुडाली पाण्यात ;-


पूर्णा तालुक्यात गेल्या २४ तासात पावसाने कहर मांडला असेल तालुक्यातील सोन्ना या गावातील गोदावरी नदीच्या काठालगत असलेल्या हजारो एकर जमिनीतील कापूस सोयाबीन हळद आदि पिके पाण्यातच आहेत परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे  अंतेश्वर येथील बंधार्‍याचे दरवाजे लवकर न खुले केल्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे शेतकऱ्यावर अस्मानी संकटात सापडला असून प्रशासनाने यावर त्वरित पंचनामे करून कार्यवाही करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड ता.अध्यक्ष गंगाधर कदम यांच्यासह येथील शेतकऱ्यांनी केली आहे
..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या