💥मंगरूळपीरच्या गुंजन आणी तृप्ती या चिमुकल्या मुलींना आता प्रशासनाची साथ...!


💥वाशिम महिला बालकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली भेट💥

💥बालसंगोपन योजनेअंतर्गत दरमहा ११००/- रुपये अठरा वर्षापर्यत मिळणार💥

मंगरुळपीर:- शहरातील वरुड रोडवरील असलेल्या अशोकनगर येथील डाके कुटुंबियातील गुंजन आणी तृप्ती या दोन चिमुकल्या मुलींचे पितृछञ हरवल्यानंतर आईही टाकुन गेली अशा अवस्थेत एकट्या आजिकडे पालनपोषणाची जबाबदारी पडली.वयस्कर असलेल्या आजीने काबाडकष्ट करुन त्या दोन चिमुकल्यांना सांभाळण्याची जबाबदारी ऊचलली,हलाकीच्या परिस्थीतीमुळे हतबल झालेल्या या दोन मुलींना सामाजीक दायित्व जोपासुन सेवाभावींनी मदतीचे हात देवुन जगण्याचे नव बळ द्यावे असे आवाहन वृत्तपञ आणी सोशल मिडियाव्दारे पञकार तसेच सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी करताच या बाबीची दखल घेत अनेक सेवाभावींनी मदतीचे हात पुढे केले.आणी आता प्रशासनानेही दखल घेवून अधिकार्‍यांनी गृहभेट घेवून या मुलींना आता दरमहा अकराशे रुपये वयाच्या अठरा वर्षेपर्यत मिळणार असल्याची माहीतीही दिली.

          पितृछञ हरवलेल्या तृप्ती आणी गुंजनला जगन्याचं बळ आणी हवी ती मदत मिळण्यासाठी अनेक वृत्तपञांनी आणी सोशल मिडियाने याबाबतील मदतीचे आवाहन केले होते.या आवाहनाला साद देत अनेक सेवाभावी,अधिकारी,कर्मचारी,राजकारणी यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.या मदतिविषयी वेळोवेळी पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी हा विषय महिला व बालकल्याण विभागाच्या समोर मांडल्यानंतर वरिष्ठांनी या बाबीची दखल घेत दि.७ सप्टेबर रोजी प्रभारी जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी भगवान ढोले,सामाजिक कार्यकर्ते जिल्हा बालसरंक्षण कक्ष वाशिमचे रमेश वाघ,बाल विकास प्रकल्प अधिकारी मंगरुळपीरचे नितिन लुंगे यांनी त्या डाके कुटुंबियांची गृभेट घेवून चौकशी करुन विचारपुस केली.सदर बालकांची गृहचौकशी केली असता बालकांचे वडिल मृत्यु पावले व आई सोडुन गेली आहे त्यामुळे सद्यापरिस्थितीत आजी त्या मुलींचा सांभाळ करीत आहे.या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देणेकरीता ही चौकशी करन्यात आली.गुंजन आणी तृप्ती या दोघींना आता बालसंगोपन योजनेअंतर्गत ११००/- रुपये प्रतिमाह त्या मुलींच्या १८ वर्षापर्यत लाभ मिळणार असल्याची माहीती यावेळी प्रभारी बालसंरक्षण अधिकारी यांनी दिली.या योजनेसाठिच्या कागदपञाची पुर्तता पुर्ण होवुन प्रस्तावही तयार झाला असुन लवकरच अनुदानाची प्रक्रिया पुर्ण होईल असेही सांगीतले.तसेच या मुलींना बालसंगोपणाची जबाबदारीही वाशिम महिला बालकल्याण विभागाकडुन करण्यात येणार असल्याबाबतही यावेळी पालक आजीसोबत करन्यात आली.यावेळी पञकार सुधाकर चौधरी,फुलचंद भगत,इरफान शेख,मंगला डाके यांची ऊपस्थीती होती.या जगात खुप दानशुर आणी सेवाभावी लोक असल्याचे मंगरुळपीर येथील अशोकनगरच्या त्या चिमुकल्या मुलींना होत असलेल्या मदतीबद्दल प्रत्यय येत आहे.काही दिवसापुर्वी दोन चिमूकल्या मुलींना मदतिचा हात हवा असल्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी सोशल मीडियातुन आणी वृत्तपञातुन केले होते त्यानंतर वृत्तपञांनीही दखल घेवूनसेवाभाविंनी वडिलांचे छञ आणी आईचीही माया नसलेल्या अशोकनगर वस्तीतील त्या मुलींना मदतीचे आवाहन केले होते.या आवाहनानंतर काही सेवाभावींनी मदतही केली.चिमुकल्या मुलींना मदतीची गरज असल्याचे कळताच बरेच सेवाभावी मंगरूळपीरला त्या कुटुंबियांना मदत देन्यासाठी पोहचले.आता प्रशासनानेही दखल घेवून महिला बालकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांनी भेट देवुन योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे.या डाके कुटुंबियांना मायेने आधार देवुन सेवाभावींनी तसेच सर्वपक्षिय व राजकारण्यांनीही सढळ हातांनी मदत करावी असे आवाहनही यावेळी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत तसेच वाशिमच्या महिला बालकल्याण विभागाकडुन करण्यात आले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या