💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे एका मुस्लिम बांधवाने केला विधिवत मृत वानराचा अंतविधि...!


💥ताडकळस येथील मुस्लीम बांधव फिरोज पठाण यांनी दाखवलेल्या मानुकीच्या भावनेचे सर्वस्तरातून होत आहे कौतुक💥 

पुर्णा (दि.१२ सप्टेंबर) तालुक्याती ताडकळस येथे एक वानर अत्यंत आजारी अवस्थेत असल्याने व त्या आजारी वानराला चालता येत नसल्याने व त्याच्या सोबत त्याचे एक छोटा पिल्लू सुध्दा असल्याचे निदर्शनास आल्याने ताड़कळस एथील एक मुस्लिम बांधव फिरोज पठान यांना कळताच त्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय,वन विभाग यांना संपर्क साधला,यानंतर फिरोज यांनी आजारी वानराला वाचण्यासाठी तात्काळ वेटर्नरी डॉक्टरांना घेऊन आले,परंतु वानर जास्त आजारी असल्याने, त्या वानराचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले आता काय करायचे ? असा प्रश्न उपस्थित झाल्याने पठाण यांनी मानुसकीची भावना जोपासत त्यांनी, ताडकळस ग्रामपंचायचे सरपंच व ग्रामपंचायत यांना कळविले परंतु दुर्दैवच म्हणावे लागेल की या पैकी कुणीही मानुसकी दाखवली नाही व कसल्याही प्रकारच्या  मदतीसाठी धावून आले नाही हिंदू धर्मामध्ये वानराला हनुमानाचे प्रतीक मानले जाते धार्मिकते थोतांड रचून स्वार्थ साधनाऱ्यांना याचे काही सोयरसुतक नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.


साक्षात हनुमानाचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या वानराला अक्षरशः  कुत्र्याने फाडून खावे हे फिरोज पठाण या मुस्लिम बांधवाच्या मनाला वेदना करून गेल्याने त्यांनी, स्वतः पुढाकार घेऊन, आपल्या मित्राच्या मदतीने त्याचा हिंदु रितीरिवाजा प्रमाणे अंत्यसंस्कार करायचे ठरवले. व जेसीबीच्या सहाय्याने, खड्डा करून, अंत्यविधीला लागणारा, कपडा, गुलाल, साखर, नारऴ, हार, सर्व साहित्य आणून, आपल्या मित्राच्या मदतीने, दफनविधी केला व त्याच्या पिल्याला सुरक्षित जागी सोडले एका मुस्लीम बांधवाने दाखवलेली ही माणुसकी निश्चितच अभिमानास्पद आहे परंतु स्वतःला हिंदु म्हणवून घेणाऱ्यांनी मानुसकीच्या भावनेला काळीमा फासत या घटनेकडे पाठ फिरवने अत्यंत लज्जास्पद बाब म्हणावी लागेल.

ताडकळस नगरीतील नागरीक फिरोज पठाण यांच्या सारख्या अत्यंत निर्मळ हृदयाच्या व्यक्तीमत्वांमुळे अजूनही मानुसकु जिवंत आहे, आज पर्यंत आपण एका मयत मुस्लिम, बांधवाचे, मुस्लिम बांधवांने, दफनविधी, केलेला बघितले असेल, परंतु ताडकळससह तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मुस्लिम बांधवांने वानराचा दफनविधी केला हे आपण पहिल्यांदाच बघितले,

असे करून, मुस्लिम बांधव पठाण यांनी, एक आदर्श निर्माण केला आहे, व सर्व कडे त्यांचे, कौतुक ही होत आहे, भारतामध्ये हिंदू-मुस्लिम जातिवाद करणाऱ्याच्या तोंडावर काळीक पूसण्याचा काम, या मुस्लिम बांधवांने केला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या