💥पत्रकारांना दमदाटीसह धक्काबुक्की करणारे मुजोर अधिकारी संजय निकम यांच्यावर कारवाई करा..!


💥पुर्णा तालुका पत्रकार संघाने 'लालबागचा राजा' येथील घटनेचा निषेध नोंदवत घटनेच्या विरोधात दिले गृहमंत्र्यांना निवेदन💥

पूर्णा (दि.११ सप्टेंबर) - मुबई येथील 'लालबागचा राजा' परिसरात दि.१० सप्टेंबर २०२१ रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी वृत्तांकन करण्यास गेलेले पत्रकार अभिषेक मुठाळ यांना तिथे बंदोबस्तासाठी कार्यरत असलेल्या पोलिस निरिक्षक संजय निकम या मुजोर पोलिस अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करीत अपमानीत करुन दमदाटी व धक्काबुक्कीसह मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

लोकशाहीची मुस्कटदाबी करणाऱ्या या घटनेचे राज्यात सर्वत्र पडसाद उमटत असून आज शनिवार दि.११ सप्टेंबर २०२१ रोजी पुर्णा तालुका मराठी पत्रकार संघाने या घटनेचा निषेध नोंदवत या घटनेसह संबंधित पोलिस अधिकारी संजय निकम यांच्या विरोधात शासनाने कठोर कारवाई करावी याकरिता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्फत निवेदन पाठवले असून या निवेदनात असे नमूद केले आहे की पत्रकार अभिषेक मुठाळ यांना पो.नि.निकम यांनी गुंडगीरीचा भाषा वापरत त्यांना धक्काबुक्की करीत गणेशोत्सव मंडपातून हाकलून दिले ही घटना लोकशाहीचा आवाज दाबण्याचा गंभीर प्रकार असून त्यामुळे राज्य शासनासह महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे अश्या मुजोर पोलिस निरिक्षक संजय निकम यांना त्वरीत निलंबीत करण्यात यावे असेही निवेदनात म्हटले असून या निवेदनावर पुर्णा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दौलत भोसले,तालुका कार्याध्यक्ष मुजीब कुरेशी,सरचिटणीस गजानन हिवरे,शहराध्यक्ष केदार पाथरकर,शहर कार्याध्यक्ष मोहन लोखंडे,शहर सरचिटणीस मो.अलीम,शहर उपाध्यक्ष सुशीलकुमार दळवी,शहर कोषाध्यक्ष संपत तेली,तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ सल्लागार तथा जेष्ठ पत्रकार विजय बघाटे सर,जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड सर,जेष्ठ पत्रकार माधव मोहिते,शेख अफसर शेख सत्तार,मो.अनीस बाबूमियाँ,मधुकर मुळे आदींच्या स्वाक्षरी आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या