💥केरळमधील श्री पद्मनाभस्वामी ट्रस्टवर आर्थिक संकट ? ट्रस्टने देणग्यांमधून खर्च भागत नसल्याचा केला मे.कोर्टात दावा...!


💥केरळमधील सर्व मंदिरं बंद आहेत आणि या मंदिराचा मासिक खर्च १.२५ कोटी रुपये इतका आहे💥

केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिर मोठ्या आर्थिक तणावात असल्याची बाब त्याच्या प्रशासकीय समितीने मे.सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे भाविकांकडून देणगीच्या रूपात देण्यात आलेली रक्कम देखील मंदिराला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पुरेशी नाही असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे. 

पद्मनाभस्वामी मंदिर त्रावणकोर राजघराण्याद्वारे चालवत जात आहे दरम्यान आता या मंदिराशी संबंधित ट्रस्टचे ऑडिट करण्याची मागणी प्रशासकीय समितीने मे.सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे समितीतर्फे उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील आर बसंत यांनी न्यायमूर्ती यू. यू. ललित, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाला सांगितलं की केरळमधील सर्व मंदिरं बंद आहेत आणि या मंदिराचा मासिक खर्च १.२५ कोटी रुपये इतका आहे. 

तर आम्हाला क्वचितच ६०-७० लाख रुपये मिळतात म्हणून आम्ही काही मार्गदर्शक तत्त्वांची विनंती केली आहे यावेळी, बसंत असंही म्हणाले की “सध्या मंदिर प्रचंड आर्थिक ताणतणावात आहे आम्ही अशा स्थितीत काम करू शकत नाही.” मंदिराच्या खर्चासाठी ट्रस्टने योगदान द्याव बसंत यांनी खंडपीठाला सांगितलं की मे.न्यायालयाच्या आदेशावर ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. 

त्यामुळे, त्याने मंदिरासाठी योगदान दिलं पाहिजे तर ट्रस्टचे ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांनी यावर असा युक्तिवाद केला की, ही राजघराण्याने स्थापन केलेली सार्वजनिक ट्रस्ट आहे प्रशासनात त्याची भूमिका नाही अमिकस क्युरिअने ट्रस्टच्या खात्यांचे ऑडिट करण्याची मागणी केल्यानंतरच मे.सर्वोच्च न्यायालयासमोर त्याचा उल्लेख करण्यात आला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या