💥परळीमध्ये करुणा शर्मांच्या वाहनात आढळले पिस्तूल ? वाहनामध्ये पिस्तूल आढळून आल्यानंतर शर्मा यांना अटक....!


💥करुणा शर्मांकडून मंत्री मुंडे यांच्या कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा आरोप काही संतप्त महिलांनी केला💥

 ✍️ मोहन चौकेकर

सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा रविवारी परळीत दाखल झाल्या. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या वाहनामध्ये पिस्तूल आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, करुणा शर्मांकडून मंत्री मुंडे यांच्या कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा आरोप काही संतप्त महिलांनी केला असून, त्यांना अटक करण्याची मागणी केली. तर, समाज माध्यमातून धनंजय मुंडेंच्या विरोधातील सर्व पुरावे जाहीर करण्याचा इशारा देऊन करुणा या परळीत दाखल झाल्या होत्या.


दरम्यान, करूणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशाखा घाडगे यांनी करूणा शर्मा यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, आज करूणा शर्मा परळीत दाखल झाल्यानंतर त्यांना जमावाने घेराव घातल्याचेही दिसून आले होते.

दरम्यान, पोलीस करूणा शर्मा यांना गाडीतून नेत असताना, त्यांनी हा मला अडकवण्याचा कट असल्याचं देखील माध्यमांना सांगितलं. तसेच, आजच्या या प्रकरामुळे या प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विविध चर्चांना देखील उधाण आलं आहे.       

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या