💥कारंजा लाड तालुक्यातील कामरगाव येथील अंगणवाडी केंद्रामध्ये मुलीच्या जन्माचे वृक्षारोपण करुन केले स्वागत....!


💥पोषण महिन्याच्या औचित्याने विविध आहार प्रदर्शनी💥

फुलचंद भगत

वाशिम:-कारंजा लाड तालुक्यातील कामरगाव येथील अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण महिन्याचे औचित्य साधून प्रत्येक दिवशी प्रत्येक गावांमध्ये पोषण आहाराबाबत विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती सुरू आहे. कामरगाव येथे दिनांक 17 सप्टेंबर रोजी आहार प्रात्यक्षिक व पौष्टीक आहार पाककृतीचे प्रदर्शनी घेण्यात आली.


            या ऊपक्रमामध्ये परिक्षेत्रातील  अंगणवाडी सेविका व स्थानिक महिला बचत गटांनी सहभाग नोंदविला यावेळी जिल्हा परिषद सदस्य मीनाताई भोणे बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक पर्यवेक्षिका लता चव्हाण उपसरपंच कामरगाव यांची उपस्थिती मध्ये कार्यक्रम घेण्यात आला यावेळी फिट कापून पाककृती प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. गरोदर महिला,स्तनदा महिला,किशोरवयीन मुली आणि कमी वजनाची बालके यांनी कशा प्रकारे आहार घ्यावा याबाबत माहिती देण्यात आली व घरगुती पद्धतीने आहार बनवण्याचे पाककृती बाबत मार्गदर्शन करण्यात आले मुलीच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार टोल फ्री नंबर चे पत्रकाचे अनावरण करण्यात आले व परिसरातील अंगणवाडी सेविकांना वाटप करण्यात आले तसेच मुलगी जन्मल्यानंतर तिच्या जन्माचे स्वागत वृक्षारोपण करण्यात आले. सदर झाडाची जबाबदारी पालक व ग्रामपंचायत यांच्यावर देण्यात आली. 30 सप्टेंबर पर्यंत दररोज पोषण महिन्यामध्ये जनजागृती करण्यावर एकात्मिक बाल विकास सेवा योजना कारंजा लाड कार्यालयाने विशेष भर दिला आहे. अंगणवाडी सेविका वर्षा खोपे व इतर अंगणवाडी सेविका,आशा ,अंगणवाडी मदतनीस यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या