💥मुलीच्या जन्माचे वृक्षारोपण करून होणार स्वागत.....!

 


💥पोषण माह निमित्त नाविन्यपूर्ण उपक्रमास मालेगाव तालुक्यातून  सुरुवात💥

फुलचंद भगत

वाशिम:-मालेगाव प्रकल्पाअंतर्गत किन्हीराजा येथे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत पोषण महिना निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पौष्टिक पाककृती प्रदर्शनी ,बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत गर्भलिंग तपासणी प्रतिबंध करण्यासाठी 8459814060 व 18002334475 ह्या टोल फ्री क्रमांकाची प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण करण्यात आले.


जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे सुचनेनुसार मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने वृक्ष लागवड करण्यात आली याच प्रमाणे प्रत्येक गावामध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत वृक्ष लागवड करून होणार आहे. तसेच 'तरंग सुपोषित महाराष्ट्राचा'अंतर्गत टोल फ्री क्रमांक बाबत मार्गदर्शन, पोषण महिना कार्यक्रम नियोजनानुसार गरोदर स्त्रिया तपासणी उपचार व समुपदेशन ,पोषण प्रतिज्ञा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी माननीय सभापती पंचायत समिती मालेगाव शोभाताई गोंडाळ जिल्हा परिषद सदस्य कमलताई गोदमले बाल विकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख, विस्तार अधिकारी मदन नायक सरपंच सुनीता राठोड पर्यवेक्षिका साधना इथापे इत्यादी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अंगणवाडी सेविका सेविका व गावातील महिलांना मार्गदर्शन केले व पोषण महा निमित्त कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिक्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेऊन यशस्वीपणे पार पाडला.


प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या