💥खेळाडूनी आपल्या परिस्थिवर मात करून आपले लक्ष वेधले पाहिजे - जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी


💥जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात रायफल शूटरचा सत्कार संपन्न💥      

वाशिम:- वाशिम जिल्हा रायफल शूटिंग असोसिएशनचे विध्यार्थी ( शूटर ) यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याने त्यांचा गुणगौरव म्हणून आज दि.10 सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या हस्ते सत्कार घेण्यात आला. यावेळी सोनल चव्हाण,जानवी मानतकर,मृणाली आकरे,क्षितिज राऊत,रुषभ ढवळे, अरहंत घुगे,चैतन्य नागरे या रायफल शूटरचा सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनात  जिपोअ वसंत परदेशी यांनी सर्व शूटरला मोलाचे मार्गदर्शन केले की,क्रीडा क्षेत्रात खेळ खेळतांना आपली परिस्थिती कशी ही असो,त्यावर मात करून आपले लक्ष वेधले पाहिजेत,रायफल शुटिंगमध्ये एकाग्रता आणि नम्रता व शांत चित्त असणे हे खूप गरजेचे आहे,सद्याच्या स्थितीला क्रीडा क्षेत्रात खेळाडूला खूप वाव आहे,मेहनती खेळाडूला खूप महत्व आहे,परंतु रायफल शूटिंग क्रीडा प्रकार हा खूप महागडा खेळ आहे,यामध्ये पालकांना आपला पाल्य खेळाडू  म्हणून समोर आणायला खूप अवाढव्य पैसे खर्च करावे लागतात,परंतु खेळ या क्षेत्रात पैश्यापेक्षा तुमच्या मेहनतीला खूप महत्व आहे,तेव्हा आपल्या परिस्थितीवर मात करून आपले ध्येय डोळ्यापुढे ठेऊन तुमचे लक्ष साधा,असा  मोलाचा सल्ला आपल्या मार्गदर्शनातून जिपोअ, वसंत परदेशी यांनी देऊन पुढील वाटचालीस विध्यार्थ्यना शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस एम जाधव,तर पालक म्हणून महावितरनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम चव्हाण,प्रशिक्षक प्रल्हाद आळणे,अनुप मानतकर,महेश आकरे,कैलास नागरे,कविता गायकवाड /घुगे उपस्थित होते.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या