💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस व परिसरातील मुसळधार पाऊसाने जनजीवन जनजीवन विस्कळीत...!


💥ताडकळस येथुन पालम,पुर्णा,परभणी,सिंगणापुर या चारही मार्गावरील येणारी जाणारी वाहतूक दुपारपासून बंद 💥

✍🏻लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी)

पुर्णा (दि.०७ सप्टेंबर) - ताडकळस व परिसरात गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊसाने ताडकळस व परिसरातील जनजीवन अक्षरशः जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहेत.


ताडकळस येथुन पालम,पुर्णा,परभणी,सिंगणापुर या चारही ठिकाणी ये -जा करण्यासाठी दुपारपासून वाहतूक बंद त्यात बळीराजा महत्वाचा सण असलेल्या पोळ्याच्या पूर्वसंध्येला सुरू झालेला पाऊस अध्यापही थांबायचे नाव घेत नाही .ताडकळस व परिसरात ०५ व ०६ सप्टेंबर रोजी दिवस भर रिमझिम तर ०६ तारखेला रात्री पासून जोरदार सुरू असलेला पाऊस ०७ सप्टेंबर रोजी देखील थांबायचे नाव घेत नाहीये .

 ताडकळस व परिसरातील मुसळधार पावसाने नदी नाले धोक्याची पातळी घेऊन ओसंडून वाहत आहेत . ताडकळस जवळील धानोरा काळे येथील गोदावरी नदी पूल, ताडकळस जवळील पिंगळगडा नदीवरील पुराने वाहतूक ठप्प झाली आहे आणि अशापरिस्थितीत येथील अनेक सरकारी कार्यालया समोर देखील पाणीच पाणी झाले आहे .

 ताडकळस येथील गावाच्या मध्यवर्ती च्या ठिकाणी असलेले छोटे तळे पूर्ण क्षमतेने भरले असून त्यामधून मोठ्या स्वरूपाचा विसर्ग सुरू झाला आहे . त्यामुळे ताडकळस ग्रामपंचायत कार्यालय ,पोलीस ठाणे ,सोसायटी कार्यालय ,परभणी ते ताडकळस रोड व तसेच गावातील अनेक सखल भागातील घरांत पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे .... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या