💥स्वच्छता ही सेवा अंतर्गत महा स्वच्छता श्रमदान कार्यक्रमात सहभागी व्हा....!


💥जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी निकम यांचे आवाहन💥

फुलचंद भगत

वाशिम:-जिल्हयात शुक्रवार दि. 24 रोजी महा स्वाच्छता श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांनी केले.

          पंचायत राज व्यवस्थेच्या त्रिस्तरीय कार्यालयाच्या परिसरात एकाच दिवशी एकाच वेळी (स. 8 वा.) महा स्वच्छता अभियान राबवुन लोकांना स्वच्छतेबाबत कृतिशिल संदेश देण्याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक 27 रोजी स्वच्छ -कार्यालय अभियान राबवुन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व विभागासह ग्राम पंचायत कार्यालयाची स्वच्छता करण्याच्या सुचना सीईओ निकम यांनी दिल्या आहेत. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  स्वच्छता ही सेवा यासह विविध उपक्रम राबवुन स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्हा परिषदेसह पंचायत समिती व सर्व ग्राम पंचायतींनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांनी केले आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या