💥औरंगाबाद येथील माजी सैनिक तथा राज्य परिवहन महामंडळाचे माजी वाहतूक नियंत्रक श्री.सुंदरराव बेद्रे यांचे दुःखद निधन...!


💥एस.व्ही.एन.फार्माचे महेश बेद्रे यांचे ते वडील आणि सामाजिक कार्यकर्ते किरण टाकळीकर यांचे ते सासरे होते💥

औरंगाबाद( प्रतिनिधी) : माजी सैनिक तथा राज्य परिवहन महामंडळाचे माजी वाहतूक नियंत्रक श्री. सुंदरराव मनोहरराव बेद्रे (वय 73) यांचे आज शनिवारी 18 सप्टेंबर 2021 रोजी  सकाळी 6.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने नवजीवन कॉलनी, हडको, औरंगाबाद येथील राहत्या घरी दु:खद निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.  शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास एन 11, हडको, औरंगाबाद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .

एस.व्ही.एन.फार्माचे महेश बेद्रे यांचे ते वडील आणि सामाजिक कार्यकर्ते किरण टाकळीकर यांचे ते सासरे होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या