💥पुर्णा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करुन तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या..!


💥प्रहार जनशक्ती पक्षाने तहसिलदार पल्लवी टेमकर यांच्या मार्फत निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली मागणी💥  

पुर्णा (दि.०८ सप्टेंबर) - पुर्णा तालुक्यात सोमवार दि.०६ सप्टेंबर ते मंगळवार दि.०७ सप्टेंबर २०२१ या दोन दिवस सातत्याने सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात पुर्णा-गोदावरी नद्यांसह अन्य लहान मोठ्या नद्यांसह ओढ्यांना आलेल्या पुरामुळे परिसरातील शेत पिक पाण्याखाली जाऊन साचलेल्या पाण्यांनी पिकांचे अतोनात नुकसान झाले .त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचणामे करून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत तात्काळ द्यावी व विमा कंपन्यांना नुकसान धारक शेतकऱ्यांना तात्काळ विमा मंजूर करण्याचे आदेश देऊन विमा नुकसान रक्कम मंजूर करून वाटप करावा. अन्यथा तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसीलदार पल्लवी टेमकर यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला असून या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के, प्रेम देसाई ,व्यंकटी हातागळे, सुशील गायकवाड आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या