💥एनटीसीत ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान : रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद...!


💥अधिकाऱ्यांनी भेटी देऊन उपक्रमाचे केले कौतुक💥

हिंगोली - ( प्रतिनिधी) दर वर्षी प्रमाणे यंदाही  छत्रपती शिवाजी राजे उद्यान परिसरात शुक्रवारी (ता.१७) सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळाच्या पुढाकारातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे रक्तदानात महिलांची संख्या मोठी आहे. यावेळी अधिकाऱयांनी भेटी देऊन गणेश मंडळाने सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.शहरातील सिद्धिविनायक सोसायटीच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायम आहे. कोरोना प्रादुर्भाव व जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाने गणेशोत्सव सण दरवर्षीप्रमाणे यंदाही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जात आहे. त्यानुसार दरवर्षी गणेशोत्सव असो की नवरात्र महोत्सव असो रक्तदान शिबिर आयोजित केल्या जाते. मागील सात वर्षा पासून रक्तदान शिबिराची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे यावर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ही योगायोगाने आला आहे .त्या दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर  येथील छत्रपती शिवाजी राजे उद्यानात परिसरात सकाळी ११ ते सायंकाळी चार पर्यन्त ठेवण्यात आले होते .यावेळी सिद्धिविनायक सोसायटी सह ,परिसरातील ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचे कृतीतून दाखवून दिले.


रक्तदान शिबिराचे उदघाटन आमदार तान्हाजी मुटकूळे,  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. राजेंद्र सुर्यवंशी,  नारायण खेडेकर , जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा ज्योतीताई कोथळकर संतोष टेकाळे, रमेश शिंदे यांची उपस्थिती होती.  सिद्धिविनायक सार्वजनिक मंडळाने राबवित असलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. स्वाती गुंडेवार यांच्यासह त्यांच्या पथकाने रक्तसंकलन केले. यावेळी गणेश मंडळाने महिलांसाठी ऑनलाईन   संगीत खुर्ची स्पर्धा उखाणे स्पर्धा तर  लहान मुलींसाठी संगीतखुर्ची , उखाणे  स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आमदार तान्हाजी मुटकुळे व जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा ज्योतीताई कोथळकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.


रक्तदान शिबिरासाठी  मंडळाचे अध्यक्ष कल्याण देशमुख, उपाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी वायभासे, उत्तमराव लोखंडे, गोविंद बियाणी , संजय भुमरे, नागनाथ लोखंडे, गजानन बांगर,  सुखबीरसिंग अलग, प्रा. नरेंद्र रायलवार , चिंतामणी गुठे, गणेश गरड, इरवंत बतलवाडीकर, नंदा यादव आदींनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या